आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवसेना-कंगना वाद:दाऊदचे घर पाडता येत नाही, कंगनाचे मात्र पाडले, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकारने कोरोना ऐवजी कंगनाला अधिक महत्व दिले, फडणवीसांची टीका

अभिनेत्री कंगना रनोट आणि शिवसेनेतील वाद सुरूच आहे. कंगना रनोटचे कार्यालय पाडल्याबद्दल फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. दाऊद इब्राहिमचे घर पाडले गेले नाही, तर कंगनाचे घर पाडले जात आहे, असे फडणवीस म्हणाले.

सरकारने कंगनाला अधिक महत्व दिले

फडणवीस म्हणाले की, शिवसेनेने कंगना प्रकरणाला जास्त महत्व दिले आहे. ती कोणता नेता नाही. तुम्ह दाऊद इब्राहिमचे घर तोडायला गेला नाहीत पण तिचा बंगला पाडला. महाराष्ट्र सरकारने जर कंगनाऐवजी कोरोनाशी लढण्यात प्रयत्न केले असते तर आज कोरोनावर नियंत्रण असते. वास्तविकता अशी आहे की महाराष्ट्र सरकार कोरोनाशी लढा देऊ इच्छित नाही. दरम्यान बीएमसीने कंगनाचे ऑफिस तोडल्यावर, हे एकाप्रकारे राज्यात 'सरकार पुरस्कृत दहशतवाद' असल्याचे काही दिवसांपूर्वी फडणवीस म्हणाले होते.