आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडणी प्रकरणात त्रिपाठी फरार:फरार डीसीपी सौरभ त्रिपाठी अखेर निलंबित; गृह विभागाच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फरार डीसीपी सौरभ त्रिपाठी यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबन प्रस्ताव मुंबई पोलिसांनी गृह विभागाकडे पाठवला होता. त्यानंतर प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे गेला होता. मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेल्या प्रस्तावावर त्यांनी स्वाक्षरी केली आहे. या खंडणीप्रकरणात गुन्हे शाखा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. या प्रकरणात युपीतून एका जणाला अटक करण्यात आली आहे.

डीसीपी सौरभ त्रिपाठी हे 2010 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्रिपाठी यांनी अहमदनगरचे पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहिलेले आहे. त्यानंतर मुंबईत परिमंडळ 4 चे पोलिस उपायुक्त म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. त्रिपाठी यांनी प्रोटेक्शन सिक्युरिटी विभागात डीसीपी म्हणून काम पाहिले आहे. त्यांची नियुक्ती परिमंडळ 2 मध्ये पोलिस उपायुक्त म्हणून करण्यात आली होती, जिथे त्यांच्यावर खंडणीचे आरोप झाले. आरोपानंतर त्यांची बदली डीसीपी ऑपरेशन या ठिकाणी करण्यात आली पण त्यांनी अद्याप चार्ज घेतला नाही.

सौरभ त्रिपाठी यांचे नेमके प्रकरण काय ?
गेल्या वर्षी 7 डिसेंबर रोजी अंगडिया असोसिएशनने मुंबईतील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे तक्रार केली होती. डीसीपी सौरभ त्रिपाठी यांनी अंगडियांना त्यांचा व्यवसाय चालवण्यासाठी दरमहा 10 लाख रुपयाची लाच देण्याची मागणी केली होती असे आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणाचे पुरावे सापडलेले असताना त्रिपाठी यांनी तक्रारदारास फोन करून तक्रार मागे घेण्यास सयांगितले होते. अशा ऑडिओ क्लिप मुंबई पोलिसांच्या हाती लागल्या आहेत.

त्रिपाठीकडून अटकपूर्व जामिनासाठी अर्ज
सौरभ त्रिपाठी यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. यापूर्वी एफआयआरमध्ये त्यांचे नाव नमूद करण्यात आले नव्हते. पोलिस ठाणे लेव्हलवर पैसै वसूल करण्यात येत असल्याची माहिती त्यांना नव्हती असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या अर्जावर 23 तारखेला सुनावणी होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...