आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गलथान कारभार:​​​​​​​ठाण्यात जिवंत व्यक्तीचे बनवले मृत्यू प्रमाणपत्र, फोन करुन सांगितले - कोरोनाने मृत्यू झाला आहे, कुणाला तरी पाठवून मृत्यू प्रमाणपत्र घेऊन जा

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयुक्त म्हणाले की ही तांत्रिक अडचण आहे.

ठाणे जिल्ह्यातून एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. येथील जिवंत व्यक्तीच्या नंबरवर फोन करुन महानगरपालिकेच्या लोकांनी सांगितले की त्याचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. इतकेच नव्हे तर त्याचे मृत्यूचे प्रमाणपत्रही तयार असल्याचे सांगितले आणि ते कुटूंबातील एखाद्याला पाठवून मागवून घ्या असे सांगितले. त्याच्या मृत्यूची बातमी ऐकताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. मात्र, जेव्हा त्या व्यक्तीने म्हटले की त्याला कोरोना झाला होता आहे, परंतु यामुळे त्याचा मृत्यू झाला नाही. त्यानंतरफोन करणाऱ्याने तपास करणार असल्याचे सांगत फोन कट केला.

ठाणे येथील 55 वर्षीय शिक्षक चंद्रशेखर जोशी यांना गेल्या आठवड्यात ठाणे महानगरपालिकेचा (TMC) फोन आला आणि त्यांनी आपले मृत्यू प्रमाणपत्र घेऊन जाण्यास सांगितले. चंद्रशेखर जोशी तेथे पोहोचले तेव्हा त्यांना एका अधिकाऱ्याने सांगितले की, ICMR च्या आकडेवारीनुसार, 22 एप्रिल 2021 रोजी तुमचा मृत्यू झालेला आहे.

पीडित व्यक्तीने गुन्हा दाखल केला
चंद्रशेखर जोशी यांनी सांगितले की, 'ऑक्टोबर 2020 मध्ये ते कोरोना पॉझिटिव्ह आले होते, परंतु त्यांनी स्वतःला होम आयसोलेट केले होते आणि त्यानंतर रिकव्हर झाले होते. महापालिकेच्या या चुकीनंतर त्यांनी कॉल रेकॉर्डिंगच्या आधारेही तक्रार दाखल केली आहे. मात्र, ठाणे महानगरपालिकेकडून यासंदर्भात कोणतेही वक्तव्य आलेले नाही. तक्रार मिळाल्यानंतर महापालिकेचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करणार असल्याचे सांगत आहेत.

महानगरपालिकेचे या प्रकरणी स्पष्टीकरण
ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप मालवी म्हणाले की, असा प्रकार समोर आला आहे परंतु टीएमसी हा डेटा तयार करत नाही. ते पुण्यातून आले आहे. आम्ही ही यादी तयार करत नाही. चूक झाली आहे, पुन्हा असे होऊ नये. ते म्हणाले की भविष्यात कोणतीही यादी आमच्याकडे येईल तेव्हा आम्ही याची पडताळणी करू आणि नंतरच लोकांना फोन करु. आयुक्त म्हणाले की ही तांत्रिक अडचण आहे. भविष्यात अशा प्रकारच्या चुका होऊ नयेत याची खात्री केली जाईल.

बातम्या आणखी आहेत...