आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना संकट:महाराष्ट्रात मृत्यू 100 च्या दिशेने; देशात एका दिवसात सर्वाधिक 44 मृत्यू, सर्वाधिक नवे रुग्णही

मुंबई3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
हे छायाचित्र गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील पडधरी ठाण्याचे आहे. येथे एएसआय नेहाबेन दोन्ही मुलांना घेऊन ठाण्यात येतात. - Divya Marathi
हे छायाचित्र गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील पडधरी ठाण्याचे आहे. येथे एएसआय नेहाबेन दोन्ही मुलांना घेऊन ठाण्यात येतात.
  • मुंबईत देशातील सर्वाधिक ८७६ रुग्ण, येथे आतापर्यंत ५४ मृत्यू
  • आता ५-६ दिवसांत रोज २०० ते ३०० रुग्ण आढळतील अशी भीती
  • देशातील एकूण रुग्णांपैकी २१% महाराष्ट्रात, तामिळनाडू दुसऱ्या स्थानी

देशात गुरुवारी कोरोनाबाधित ९३५ रुग्ण आढळले. एका दिवसातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी संख्या आहे. तर, ४४ मृत्यूंसह देशभरातील मृतांची संख्या २२५ झाली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक २५, मप्रमध्ये ७, दिल्लीत ३, गुजरात व पंजाबमध्ये प्रत्येकी २ तर, झारखंड, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, ओडिशा व राजस्थानात प्रत्येकी एक मृत्यू झाला. संसर्गाबाबत महाराष्ट्र, विशेषत: मुंबईची अवस्था अत्यंत वाईट आहे. महाराष्ट्रात २२९ रुग्ण नवे रुग्ण आढळल्याने रुग्णांची संख्या १,३६४ झाली. देशातील एकूण रुग्णांपैकी २१% एकट्या महाराष्ट्रात आहेत. येथे मृत्यू झालेल्यांची संख्या ९७ झाली आहे. मंुबईत गुरुवारी १६२ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे रुग्णांची संख्या ८७६ वर गेली. ९७ पैकी ५४ मृत्यू एकट्या मुंबईतील आहेत. येथे देशातील सर्वाधिक ३८१ कंटेनमेंट एरिया तयार करण्यात आले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात पोलिसांचे शीघ्र कृती दल तैनात करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

१० दिवसांत अशी बदलली स्थिती

राज्य   रुग्ण, 31 मार्च   9 एप्रिल
महाराष्ट्र    302    1364
तामिळनाडू    74834
दिल्ली     97720
तेलंगण    77453
राजस्थान    93430
उत्तर प्रदेश108410
मध्य प्रदेश65357
केरळ    241357
अांध्र प्रदेश40348
गुजरात    73262
कर्नाटक98197
हरियाणा 25156
पंजाब41130
प. बंगाल 26104
बिहार1651
िहमाचल329
चंदीगड 1318
छत्तीसगड818
झारखंड113

हरियाणात डॉक्टरांना दुप्पट वेतन : हरियाणाचे मुख्यमंत्री खट्टर यांनी मेडिकल, पॅरामेडिकल स्टाफ, चतुर्थ श्रेणी कर्मचारी व रुग्णवाहिका चालकांना दुप्पट पगार देण्याची घोषणा केली आहे. 

ओडिशा : नियमभंगास २ वर्षे कैद

महामारीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना दोन वर्षे कैदेची तरतूद असणारी अधिसूचना काढण्याची तयारी ओडिशात सुरू आहे. कायद्यात नियमभंगासाठी सहा महिने कैद आणि एक हजार दंडाची तरतूद होती. 

इंदूर : देशात पहिल्या डॉक्टरचा मृत्यू

कोरोनामुळे इंदूर येथे गुरुवारी सकाळी एका डॉक्टरचा मृत्यू झाला. ६२ वर्षीय डॉ. शत्रुघ्न पंजवानी जनरल फिजिशियन होते आणि खासगी प्रॅक्टिस करायचे. कोरोनामुळे डॉक्टरचा मृत्यू होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे.

राजकोट : देशभरातील पोलिसांच्या सुट्या रद्द आहेत. त्यामुळे काही राज्यांतून कर्तव्य आणि कुटुंबात ताळमेळ साधण्याची अशी दृश्ये समोर येत आहेत.  हे छायाचित्र गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील पडधरी ठाण्याचे आहे. येथे एएसआय नेहाबेन दोन्ही मुलांना घेऊन ठाण्यात येतात. त्यांचे पती राजकोटचे एसएचओ आहेत. छोटी मुलगी ध्याना १० महिन्यांची आहे. तिला झोळीत झोपवून नेहाबेन कामकाज करतात.

बातम्या आणखी आहेत...