आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Decision Giving Direction Pankaja Munde Said Reservation Criteria Are Decided After Proper Study; Important Decisions For Future Generations

दिशा देणारा निर्णय पंकजा मुंडे:म्हणाल्या - आरक्षणाचे निकष योग्य अभ्यास करू ठरविले जातात; भविष्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरक्षणाबाबत राजकारण केले जाऊ नये, असे म्हणताना नव्या पिढ्यांना दिशा देणारा निर्णय असल्याचे मत भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे. आरक्षणाचे निकष योग्य अभ्यास करून ठरविले जातात. यामुळे हा निर्णय भविष्यातील पिढ्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले आहे.

आर्थिक आरक्षणाचे निकष काळानुरूप बरोबर ठरतील, तो निकष ठरवणारी एक टीम आहे, जी त्यावर योग्य अभ्यास करून निर्णय घेत असते यामुळे आर्थिकदृष्टीने मागासलेल्या तरुणांना सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. मागासवर्गीय लोकांच्या आरक्षणाला धक्का न लागता जर आरक्षण देण्यात येत असले तर ते खूप चांगले आहे. सामाजिक मागासले पण कायमचे सोडण्यासाठी आरक्षणाला कायम ठेवणे गरजेचे आहे. हा निर्णय घेताना एक व्यक्ती निर्णय घेत नसते, अभ्यास करून सर्व टीम काम करत असते, मात्र सामाजिक आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिल्याने त्याला विरोध का करावा, ते योग्यच आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, कोणत्याही महिलेवर टीका करताना, आदरयुक्त टीका केली पाहिजे, टीकेची पातळी सोडता कामे करू नये, प्रत्येक पक्षातील नेत्यांनी राजकारण करत असताना महिला आणि पुरुषांवर टीका करताना अगदी तिचा स्तर खालचा नसावा असे मत पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. खासदार पूनम महाजन यांनी केलेले वक्तव्य हे कोणत्यातरी वक्तव्याला धरुन असेल असे दिसून येते.

युपीएचे घटक पक्ष असणाऱ्या पक्षांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणे यात काही गैर नाही, त्यांचे घटक पक्ष असल्याने ते यात्रेत जाऊ शकतील असे ही पंकजा मुंडेंनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...