आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात ६९२.७४ चौ.कि.मी क्षेत्राचे नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्र आणि विस्तारित लोणारसह ३ अभयारण्ये घोषित करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सोमवारी मान्यता देण्यात आली. याबाबतचा प्रस्ताव तत्काळ राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे सादर करण्याचे निर्देश दिले.
वनक्षेत्रातील गावकऱ्यांचे पुनवर्सन आणि त्यांना देण्यात येणारा मोबदला याबाबत विश्वासात घेऊन चर्चा करा, असे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची १८ वी बैठक वर्षा शासकीय निवासस्थानी झाली. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, वनक्षेत्रातील रस्ते विकासाच्या कामांना मान्यता देताना वन्यजीवांच्या भ्रमण मार्गांची काळजी घेण्यात यावी. विशेषतः संवेदनशील तसेच व्याघ्र प्रकल्पातील कामांबाबत विशेष काळजी घेण्यात यावी. अभयारण्य क्षेत्रातील गावांच्या विकासकामांबाबत स्थानिकांशी चर्चा करण्यात यावी, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
कोल्हापूरचे मसाई पठार ‘संवर्धन राखीव क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आाले.
राखीव क्षेत्रांमध्ये धुळे जिल्ह्यातील (दोन) चिवटीबावरी, अलालदारी, नाशिक जिल्ह्यातील (चार) कळवण, मुरागड, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, रायगड (दोन) रायगड, रोहा, पुणे जिल्ह्यातील भोर, सातारा जिल्ह्यातील दरे खुर्द (महादरे) फुलपाखरू यासह इतर क्षेत्रांचा समावेश आहे.
राज्यात १० धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करण्यात आले. त्यामध्ये मयूरेश्वर – सुपे , बोर, नवीर बोर, विस्तारित बोर, नरनाळा, लोणार वन्यजीव अभयारण्य, गुगामल राष्ट्रीय उद्यान, येडशी रामलिंगघाट वन्यजीव अभयारण्य, नायगाव- मयूर वन्यजीव अभयारण्यासह इतर क्षेत्रे आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.