आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशांचेअवैध व्यवहार प्रकरण:मलिक यांच्या जामिनावर 30 नोव्हेंबरला निर्णय

मुंबई3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जामिनाबाबतचा निर्णय ३० नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. याबाबतची ऑर्डर तयार नसल्याचे गुरुवारी विशेष न्यायालयाने सांगितले. जुलै महिन्यात त्यांनी नियमित जामिनासाठी अर्ज केला होता.

पैशांच्या अवैध व्यवहारप्रकरणी नवाब मलिक अटकेत आहेत. १४ नोव्हेंबर रोजी विशेष न्यायाधीश आर.एन.रोकडे यांनी मलिक यांच्या जामिनाबाबतचा आदेेश राखून ठेवून गुरुवारी सुनावणी ठेवली. जामीन अर्जावर गुरुवारी मलिक आणि सरकारी पक्षाने प्रदीर्घ युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायालयाने ऑर्डर तयार नसल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...