आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पावसाळी अधिवेशन:अधिवेशनाबाबत 9 जूनला निर्णय, काेरोनाच्या पार्श्वभूमीवर अवधी कमी केला जाण्याची शक्यता

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तीनऐवजी एकच आठवडा अधिवेशन होण्याची शक्यता
Advertisement
Advertisement

राज्याच्या विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाबाबत निर्णय घेण्यासाठी ९ जून रोजी कामकाज सल्लागार समितीची बैठक होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

२२ जूनपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन प्रस्तावित आहे. मात्र सध्या मुंबई व संपूर्ण राज्यातच कोरोना संसर्गाचा मोठा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे अधिवेशन पुढे ढकलले जाणार की तीन आठवड्यांचा कालावधी कमी केला जाणार, यासंदर्भात उत्सुकता आहे.

संसदेचे पावसाळी अधिवेशन यंदाही वेळेतच होईल, असे सूचक वक्तव्य लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले होते. संसदेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील विधिमंडळाचे अधिवेशन निर्धारित वेळत मात्र कमी कालावधीचे होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

तीनऐवजी एकच आठवडा अधिवेशन

३ आठवड्यांचे होणारे अधिवेशन एका आठवड्याचे करण्यात येईल किंवा गर्दी टाळण्यासाठी दोन्ही सभागृहे वेगवेगळ्या दिवशी बोलावली जातील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासंदर्भातला निर्णय ९ जून रोजी घेतला जाणार आहे.

Advertisement
0