आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोनाचा परिणाम:वाढती रुग्णसंख्या पाहता ठाणे शहरात 19 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय, महापालिका आयुक्तांनी जारी केला आदेश 

ठाणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गंभीर बाब म्हणजे मुंबईपेक्षा ठाण्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या जास्त आहे.
Advertisement
Advertisement

राज्यभरात कोरोनाचा संसर्ग हा झपाट्याने वाढत आहे. दरम्यान आता ठाण्यामध्येही कोरोनाने विळखा घातला आहे. याच कारणामुळे ठाणे शहरात लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाण्यात यापूर्वीच 12 जुलैपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेला होता. आता हा लॉकडाऊन आता 19 जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.

यापूर्वी 2 जुलै ते 12 जुलै सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आला होता. मात्र ठाण्यातील कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढच होत आहे. लॉकडाऊन सुरू असतानाही रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. या गंभीर बाब म्हणजे मुंबईपेक्षा ठाण्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या जास्त आहे.  हे लक्षात घेता हा लॉकडाऊन आठ दिवस वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाऊनमध्ये आता 19 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आता 19 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ठाणे महापालिका हद्दीत लॉकडाऊन असणार आहे. असे पालिका आयुक्तांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.

Advertisement
0