आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय जारी:‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा निर्णय जारी, 30 सप्टेंबरपर्यंत ‘एमपीएससी’कडे प्रस्ताव पाठवण्याची सूचना

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली २८ जुलै रोजी झालेल्या बैठकीनंतर अवघ्या दोन दिवसांत वित्त विभागाचा हा शासन निर्णय जारी झाला.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांतील उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदांसह उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेली आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी परवानगी देण्यात आली अाली. तसा शासन निर्णय ३० जुलैला जारी करण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली २८ जुलै रोजी झालेल्या बैठकीनंतर अवघ्या दोन दिवसांत वित्त विभागाचा हा शासन निर्णय जारी झाला. ही रिक्त पदे भरण्यासाठी संबंधित विभागांनी बिंदुनामावली तयार करून, उचित मान्यता घेऊन ३० सप्टेंबरपर्यंत ‘एमपीएससी’कडे प्रस्ताव पाठवण्याचे शासन निर्णयात स्पष्ट केले आहे. ‘कोरोना’च्या संकटामुळे केवळ सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील पदांच्या भरतीला यापूर्वी मंजुरी देण्यात आली होती. ४ मे २०२० आणि २४ जून २०२१ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील इतर विभागांतील रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेवर निर्बंध होते. विशेष बाब म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनातील विविध विभागांतील रिक्त पदांच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ही रिक्त पदे भरण्यासाठी संबंधित विभागांनी ३० सप्टेंबरपर्यंत ‘एमपीएससी’कडे रिक्तपदांचा प्रस्ताव पाठवण्यास सांगण्यात आल्याने ‘एमपीएससी’ची रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अजित पवार यांनी राज्यात १५ हजार ५०० हून अधिक पदांची भरती करण्याचे विधिमंडळात जाहीर केले आहे. त्या प्रक्रियेला यानिमित्ताने सुरुवात झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...