आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

महत्त्वाचा निर्णय:वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील स्थानिक विद्यार्थ्यांसाठी 70 टक्के जागा राखून ठेवण्याचा निर्णय रद्द, अमित देशमुख यांची विधानसभेत घोषणा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्य सरकारकडून गेल्या अनेक वर्षांची मागणी पूर्ण, मराठवाडा-विदर्भातील विद्यार्थ्यांना दिलासा

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील स्थानिक विद्यार्थ्यांसाठी 70 टक्के जागा राखून ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारकडून रद्द करण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी विधानसभेमध्ये यासंबंधी घोषणा केली. या निर्णयामुळे मराठवाडा, विदर्भातील वैद्यकीय प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

राज्यातील वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय महाविद्यालयांचे मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र असे वर्गीकरण करून या अभ्यासक्रमांसाठी स्थानिक विद्यार्थ्यांसाठी जागा राखून ठेवल्या जात असतात. त्यानुसार ज्या भागांतील वैद्यकीय महाविद्यालय आहे. तेथील विद्यार्थ्यांसाठी 70 टक्के जागा राखीव ठेवल्या जात होत्या. तर उर्वरित 30 टक्के जागांवर राज्यभरातील इतर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळायचा. दरम्यान मराठवाडा आणि विदर्भात महाविद्यालयांची संख्या कमी होती. तर प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती. यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. याच कारणामुळे हा निर्णय रद्द करण्याची मागणी पालक आणि विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात केली जात होती. आज राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.