आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Decline In Industrial Consumption Of Electricity In The State During Corona Period, While Increase In Domestic agricultural Consumption Hit MSEDCL

महावितरण:राज्यात कोरोनाकाळात विजेच्या औद्योगिक वापरात घट, तर घरगुती-कृषी वापर वाढल्याने महावितरणला 7 हजार 500 कोटी रुपयांचा फटका!

मुंबई / अशोक अडसूळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वीज वापराचे गणित बदलले, 1,632 दशलक्ष युनिट वापर वाढूनही महावितरणच्या महसुलात आली तूट

कोविड काळात एका बाजूला महागडी वीज खरेदी करणाऱ्या औद्योगिक-वाणिज्यिक ग्राहकांच्या (सबसिडायजिंग ग्राहक) अपेक्षित वीज वापरात राज्यात मोठी घट झाली, तर दुसऱ्या बाजूला कमी दराने वीज खरेदी करणाऱ्या घरगुती आणि कृषी ग्राहकांच्या (अनुदानित ग्राहक) वीज वापरात मोठी वाढ हाेती. परिणामी सन २०२०-२१ कोविड काळात महावितरण कंपनीला तब्बल ७ हजार ५०० कोटींचा फटका बसल्याची माहिती पुढे आली आहे.

राज्याला ऊर्जा पुरवणारी राज्य सरकारची महावितरण कंपनी मोठ्या आर्थिक अडचणीत आहे. महसुली तूट वाढण्यास वीज ग्राहकांची थकबाकी कारणीभूत असल्याचा सर्वसाधारण समज होता. मात्र कोरोनाकाळात वीज वापराचे बदललेले गणित हेच महावितरणची तूट वाढण्यास कारण असल्याचे दिसून आले. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या काळात महावितरण कंपनीचा महसुली खर्च ७८ हजार कोटी इतका होता, तर प्रत्यक्ष जमा महसूल ६५ हजार २५० कोटी इतका होता. परिणामी कोविड काळातील महावितरणची महसुली तूट १२ हजार ७५१ कोटींवर गेली. या महसुली तुटीचा परिणाम म्हणून महावितरणवरचे कर्ज ३ हजार ८१९ कोटींनी वाढून ४२ हजार ९७१ कोटींवर पोहोचले आहे. सन २०१९ मध्ये महावितरणाचा वीज वापर १ लाख ७ हजार ८८१ दशलक्ष युनिट (दलयु) होता. तो २०२०-२१ मध्ये १ लाख ९ हजार ५१३ दलयु झाला. म्हणजे कोरोनाकाळात वीज वापर १,६३२ दलयु वाढूनही महावितरणला महसुलात मात्र वाढ होण्याऐवजी ७ हजार ५०० कोटींचे नुकसान सोसावे लागले. हे सर्व केवळ वीज ग्राहकांच्या वापरात झालेल्या बदलाने झाल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले. सन २०१९-२० मध्ये महावितरणच्या वसुलीचे प्रमाण ८८.१२ टक्के, तर २०२०-२१ मध्ये ८६.७८ टक्के होते. याचा अर्थ महावितरणाला महसुली तुटीचा बसलेला फटका केवळ थकबाकीमुळे बसलेला नसून वीज वापरातील ग्राहकांच्या बदललेल्या गणिताने बसला आहे.

एकंदरच कोरोनामुळे उद्योग, व्यापार, खासगी नोकरदार यांचे कंबरडे मोडले तसेच महावितरणचे मोडले. मात्र त्याला सबसिडायजिंग ग्राहकांचा वीज वापर घटून सबसिडाइज्ड ग्राहकांचा वाढलेला वीज वापर कारणीभूत ठरला आहे.

बातम्या आणखी आहेत...