आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Deepak Kesarkar Critizsize To Sanjay Raut | Sanjay Raut Arrestder Ed | We Are Not Happy About ED's Action, Arrest As Sanjay Raut Is Trying To Change Evidence

दीपक केसरकरांचा आरोप:संजय राऊत पुरावे बदलण्याचे प्रयत्न करत असल्याने ईडीची कारवाई, अटक झाल्याबद्दल आम्हाला आनंद नाही

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संजय राऊत निर्दोष असतील तर ते कोर्टासमोर पुरावे सादर करतील, त्यामुळे त्यांना कोठडीत न जाणे शक्य होईल. जर ते खरोखर या प्रकरणामध्ये दोषी आढळले किंवा पुरावे न्यायालयात सिद्ध झाले तर, त्यांना कोठडीत जावे लागेल ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यावर कारवाई करावी, अशाप्रकारची कोणतीही मागणी आम्ही केलेली नाही, असे स्पष्टीकरण शिंदे गटाचे प्रवक्ता दीपक केसरकर यांनी दिले. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

पुढे केसरकर म्हणाले की, संजय राऊत यांना ईडीने सातत्याने मुदत दिली होती. ते देखील आपल्याला चौकशासाठी मुदत मिळावी, याची मागणी करत होते. परंतु दोन दिवसांपूर्वी त्यांची एक क्लिप व्हायरल झाली त्यात त्यांनी सांगितले होते की, तुम्ही ईडीला दिलेला जबाब बदला. तपास यंत्रणा ज्यावेळी चौकशी करत असते, त्यावेळी पुरावे नष्ट करण्याचे जर प्रयत्न झाले, तर तपास यंत्रणा लवकरात लवकर कारवाई करते. कारण, त्यांना पुरावे नष्ट होण्याची शक्यता असते, त्यामुळे कदाचित हे देखील कारण संजय राऊत यांच्या अटकेची असू शकतील, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली असेल.

पुरावे बदलण्याचा प्रयत्न

पुरावे बदलण्याचा आपण प्रयत्न करता कामा नये. ती व्हायरल क्लिप त्यांची होती की नाही हे मला माहिती नाही. परंतु राऊतांनी आपण हे बोललो याचा नकार दिलेला नाही. त्यामुळे आज ज्या कारवाया झालेल्या आहेत ते फक्त राजकीय व्यक्तींवर झालेल्या आहेत असे नाही, तर अनेक मोठमोठे बिल्डर्स यांच्यावर देखील ईडीने कारवाई केली असल्याचे केसरकर म्हणाले.

म्हणून लोकं रस्त्यावर उतरली

री-डेव्हलमेंट ही जी योजना काढण्यात आली, ज्यामध्ये झोपडपट्टीतील लोकं, चाळीतील लोकांना हक्काचे घरे मिळावे हे स्वप्न बाळासाहेबांचे होते. ते स्वप्न साकार होत असताना जर या ठिकाणच्या लोकांना रस्त्यावर उतरावे लागत असेल. त्यांना जर त्यांच्या हक्काचे घर मिळत नसतील तर, अशाप्रकारे काही बिल्डर्संना रोखण्याचे काम होत आहे, असेही केसरकर म्हणाले.

जाणून-बुजून कारवाई नाही

मोठे-मोठे बिल्डर्स या आरोपाखाली जेलमध्ये आहेत. त्यामुळे ही कारवाई जाणून-बुजून झाली असे म्हणता येणार नाही. जे कोणी निर्दोष असतील त्यांनी निर्दोष असल्याचे पुरावे सादर करावे. आमच्या पैकी एकही जणांनी राऊतांवर कारवाई करा, अशी मागणी केलेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वारीचा आणि या कारवाईचा काहाही संबंध लावू नये, असे आवाहन केसरकरांनी केले.

याचा अर्थ लावू नये

एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळ विस्ताराच्या बाबतीत दिल्लीला गेले होते. आमच्या सरकारचा लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. अशा परिस्थितीमध्ये याचा थेट संबंध लावणे चुकीचे आहे. आमच्या काही आमदारांनी राऊत यांच्या अटकेनंतर काही प्रतिक्रिया दिल्या, त्यांना त्रास झाला होता, म्हणून त्यांनी मनातले बोलेले. राऊतांना अटक झाल्याचा आम्हाला कोणताही आनंद नाही, त्यांना जे काही कायद्याच्या दृष्टीने मार्ग उपलब्ध आहे ते त्यांनी पालन करावे, असेही केसरकर यांनी सांगितले.

राऊतांना राष्ट्रवादीच पर्याय

राऊतांनी कुठल्यातरी पक्षात यावे, यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. मात्र, असे नाही त्यांना जर दुसऱ्या पक्षात प्रवेश घ्यायचा असला तर ते राष्ट्रवादीत जातील. कारण, त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही पक्ष त्यांना घेणार नाही. त्यामुळे त्यांनी उगीच राजकीय विषय करू नये.

बातम्या आणखी आहेत...