आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदावर डोळा ठेवत बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली आहे, अशी टीका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे.मराठी माणसाला संपविण्यासाठी मुंबईतील मराठी शाळा बंद करण्याचा आदित्य ठाकरेंचा डाव आहे. त्यासाठी मराठी शाळा बंद करून इंग्लिश शाळांना परवानगी दिली असा आरोप ही मंत्री केसरकर यांनी केला आहे.
नेमके काय म्हणाले केसरकर?
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, मुंबईतील मराठी शाळा बंद करून इंग्रजी शाळा सुरू करण्याचे काम या मंडळींनी केले आदित्य ठाकरेंनी इंग्रजी शाळा सुरू करण्यासाठी लोटांगण घातले. मुंबईतील मराठी कार्यालय हलवण्यासाठी ठाकरे यांनी पुढाकार घेतला असा दावा केसरकरांनी केला आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंवरही केसरकरांनी टीका केली आहे.
अडीच वर्षांत मंत्रातलयात आले नाही
मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे हे कधील मंत्रालयात आले नाही, तर आदित्य ठाकरेंनीही मंत्रालयाकडे पाठ फिरवली होती. अडीच वर्षांच्या कार्यकाळात सर्व रिमोट कंट्रोल हा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे होता. अजित पवार मंत्रालय सांभाळत होते. हे दुर्देव होते आणि बाळासाहेबांचे विचार संपविण्याचे काम काँग्रेस व राष्ट्रवादी करत असताना आम्ही 40 आमदारांनी बाळासाहेबांचे विचार राखण्यासाठीच स्वतंत्रपणे निर्णय घेतला असेही त्यांनी म्हटले आहे.
शिवसेनेने उपमुख्यमंत्रिपद नाकारले
दीपक केसरकर म्हणाले की, आदित्य ठाकरे शिवसैनिकांची दिशाभूल करत आहेत, आमच्या 50 आमदारांच्या संयमाला मर्यादा आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वीच शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद देण्याचे निश्चित केले होते पण त्यानी ते स्वीकारले नाही. उद्धव ठाकरे यांच्या बद्दल आदर असल्यामुळे आम्ही गप्प आहोत. या मर्यादा तुटल्या तर संयमाचा बांध फुटू शकतो, मात्र आदित्य ठाकरे आता मर्यादांचा बाण सुटत चालला आहे, असे केसरकर यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.