आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीका:दीपक केसरकरांनी चंद्रकांत पाटलांना सुनावले खडे बोल; राजकारणात स्थान टिकवायचे असेल, तर संयमाने बोलण्याचा सल्ला

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकारणात स्थान टिकवायचे असेल तर संयमाने बोलावे लागते, याबाबत मी चंद्रकांत पाटलांना सांगायची गरज नाही ते ज्येष्ठ नेते आहेत. चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल मुख्यमंत्री आणि अमित शहांनी आधीच नाराजी देखील व्यक्त केली आहे, असे म्हणत शिवसेनेचे प्रवक्ते तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी चंद्रकांत पाटील यांना खडे बोल सुनावले आहेत.

बाबरी पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, असे वक्तव्य भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी यावरुन शिंदे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनंतर दीपक केसरकर यांनी देखील चंद्रकांत पाटलांवर टीका केली आहे.

कोणाचीही हिंमत होणार नाही

दीपक केसरकर म्हणाले, चंद्रकांत पाटलांसारख्या ज्येष्ठ नेत्याने बोलताना भान ठेवून बोलायला पाहिजे. हे वरपर्यंत पोहोचले आहेत. चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल मुख्यमंत्री आणि अमित शाहांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. त्यांनी त्यांचे कान टोचले आहेत. यापुढे बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही.

उद्धव ठाकरेंना टोला

दीपक केसरकर म्हणाले, मुख्यमंत्री कोणालाही घाबरत नाही. त्यांनी कालच याबद्दल आपली नाराजी व्यक्त केली. ज्येष्ठ नेत्याने भान ठेवून बोलले पाहिजे. तुम्ही हिंदुह्रदयसम्राट म्हणायला घाबरत होता, संभाजीनगर नामांतराला घाबरत होता, असे म्हणत उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

काय म्हणाले पाटील?

बाबरी पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, असे वक्तव्य भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यात ते म्हणाले की, 6 डिसेंबर 1992 रोजी बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनीने बाबरी मशीद पाडली. बाबरी मशिदीचा ढाचा शिवसैनिकांनी पाडला नाही. ती कारसेवकांनी पाडली. बाबरी पाडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे जबाबदारी घेतो म्हणाले. म्हणजे काय? त्यांनी चार सरदार तरी पाठवले का, असा सवालही त्यांनी या मुलाखतीत केला.

विरोधकांचे टीकास्त्र

मंत्री चंद्रकांत पाटील यांची हकालपट्टी करा, अन्यथा एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. तर संजय राऊत म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले. नंतर खुलासा करुन पलटी मारली. केवळ खुलाशावर आमचे समाधान होणारे नाही. चंद्रकांत पाटलांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे.

संबंधित वृत्त

नसती उठाठेव:चंद्रकांत पाटलांवर हायकमांड नाराज

बाबरी पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, हे वक्तव्य भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांना भोवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण चंद्रकांत पाटील यांच्यावर भाजपचे हायकमांड आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तीव्र नाराज असल्याचे समजते. त्यांनी भाजप आमदार आशिष शेलार यांना तसे स्पष्ट संकेत दिलेत. वाचा सविस्तर