आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोला:अयोध्येत महाराष्ट्र भवन बांधण्याचा शिंदेचा मानस, महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या मनातलाच मुख्यमंत्री : दीपक केसरकर

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अयोध्येत जाणाऱ्या महाराष्ट्रीय लोकांसाठी महाराष्ट्र भवन बांधण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मानस असल्याचे मंत्री दीपक केसरकर माध्यमांशी बोलताना म्हणाले. तसेच उद्धव ठाकरेंच्या मनातलाच मुख्यमंत्री सध्या महाराष्ट्रात असल्याचे सांगत त्यांनी ठाकरेंना टोलाही लगावला.

अयोध्येत महाराष्ट्र भवन

अयोध्येत जाणाऱ्या महाराष्ट्रीय लोकांसाठी राहण्याची चांगली सोय व्हावी यासाठी आयोध्येत महाराष्ट्र भवन बांधण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मानस आहे. असे दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. त्यामुळे उद्या शिंदे आणि योगी यांच्या भेटीत नक्कीच चांगले काही घडेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

मुख्यमंत्र्यांचा उद्या आयोध्या दौरा

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दोन दिवसीय अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते राम मंदीरात जाऊन महाआरती करणार असून नंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार आहेत.

काय म्हणाले केसरकर?

मोठ्या माणसात आपण फार बोलायचे नसेते. स्वत: नरेंद्र मोदींनी बोलावलेले असतानाही उद्धव ठाकरे आले नाहीत. मोदींना दिलेले वचन त्यांनी मोडलेय. यात मोदी साहेबांनी त्यांना माफ करायला हवं. शेवटी मोठ्या भावाने लहान भावाला माफ करायला हवे, असेही केसरकर म्हणाले.

ज्याप्रकारे उद्धव यांनी मोदींचा अपमान केला, त्यानंतर हे जुळवून आणणे उद्धव ठाकरेंच्या हातात असल्याचेही केसरकर म्हणाले. आम्हाला जेवढं शक्य तेवढं आम्ही केले. हे काळाच्या ओघात झालेली गोष्ट आहे असे सांगत एकनाथ शिंदे हे चांगला कारभार करतील असेही केसरकर म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या मनातला मुख्यमंत्री

केसरकर पुढे म्हणाले, उद्धव ठाकरेंनीच एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायचे ठरवले. त्यांचे म्हणणे असे होते की पवार साहेबांनी दबाव आणला आणि त्यामुळे मला मुख्यमंत्री व्हावे लागले. म्हणजे एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री असले असते. म्हणजे त्यांच्या मनात असलेलेच मुख्यमंत्री आता महाराष्ट्रात आहेत, त्यामुळे त्यांना वाईट वाटण्याचे काही कारण नाही, असा टोलाही केसरकर यांनी लगावला.