आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे शैक्षणिक धोरण येत्या जूनपासून:वैद्यकीय, अभियांत्रिकी शिक्षण मराठीतून शिकवले जाणार - शिक्षणमंत्री दिपक केसरकर

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येत्या जूनपासून नवीन शैक्षणीक धोरण राज्यात लागू होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी केली आहे. तसेच वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण पुढील काळात मराठीमध्ये शिकवले जाणार असल्याने मराठी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा दिलासा असल्याचेही केसरकर म्हणाले.

देशात शालेय शिक्षणाचे स्वरुप आतापर्यंत 10+2 असे होते. पण नव्या धोरणात दहावी किंवा बारावी परीक्षा ही बोर्डाची असेल, असा उल्लेख केलेला नाहीत. 10+2 ही शिक्षण पद्धत जाऊन त्याऐवजी 5+3+3+4 अशी नवी व्यवस्था लागू होईल असेही ते म्हणाले.

काय म्हणाले केसरकर?

नवीन शैक्षणीक धोरण येत्या वर्षापासून लागू होणार आहे. तसेच अभियांत्रिकी, मेडीकलमधील शिक्षण यापुढील काळात मराठीमध्ये शिकवले जाणार आहेत. शैक्षणीक धोरण येत्या काळात महत्वाचे ठरावे यासाठी हा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. राज्य सरकारही याची अंमलबजावणी महाराष्ट्रात येत्या शैक्षणीक वर्षापासून करणार असल्याची माहिती दिपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

मोदी सरकारने नव्या शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली आहे. तब्बल 34 वर्षांनंतर देशात नवे शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. राज्यात येत्या शैक्षणिक वर्षापासून नवे शैक्षणिक धोरण लागू केले जाणार आहे.

नवे शिक्षण टप्पे

पहिल्या टप्पा : पूर्व प्राथमिकचे तीन वर्ष आणि इयत्ता पहिली ते दुसरी

दुसऱ्या टप्पा : इयत्ता तिसरी ते पाचवी

तिसऱ्या टप्पा : सहावी ते आठवी

चौथा टप्पा : नववी ते बारावी