आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात जवळपास 20 हजार शिक्षकांची भरती केली जाईल, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
तसेच आधार वेरिफिकेशन विद्यार्थ्यांचे पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती संदर्भात आकडा कळेल, असेही मंत्री दीपक केसरकर यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना म्हटले आहे.
नव्या शैक्षणिक वर्षाआधी भरती!
दीपक केसरकर म्हणाले की, नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच 30 हजार शिक्षकांची भरती करण्याचा आमचा विचार आहे. तर दुसऱ्या दुसऱ्या टप्प्यात जवळपास 20 हजार शिक्षकांची भरती केली जाईल. विद्यार्थ्यांचे आधार वेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती संदर्भात आकडा कळणार आहे, असे केसरकरांनी म्हटले आहे. त्यासाठी संच मान्यता झाली पाहिजे. कारण आरक्षणानुसार ही पद भरती होईल. या उमेदवारांच्या मुलाखती होऊन त्यांची भरती केली जाईल.
युनिफॉर्मबाबतच्या निर्णयासंदर्भात विचार करू
दीपक केसरकर म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या एकच युनिफॉर्मबाबतचा निर्णय यावर्षी घ्यायचा की पुढल्या वर्षी घ्यायचा या संदर्भात एक ते दोन दिवसात विचार करत आहोत. त्यानंतर ठरवले जाईल, असे दीपक केसरकर यांनी स्षष्ट केले आहे. तर ऑर्डर दिलेली नाही किंवा कुठल्याही प्रकारे पैसे ट्रान्सफर केलेले नाहीत. स्वतःचे अधिकार वापरुन ज्यांनी आधीच युनिफॉर्म संदर्भात ऑर्डर दिलेली आहेत त्यांनी बैठकीसाठी विचारणा केली आहे. यामध्ये महिला बचत गटांना काम मिळवून देण्याचे शासनाचे धोरण आहे. स्काऊट गाईड, एनएसएस हे कंपल्सरी करणार आहोत. त्यांना एक पर्टिक्युलर युनिफॉर्म दिला तर गणवेशाचा डबल खर्च होणार नाही. बूट सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना देणार आहोत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.