आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआम्ही कधीही शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडले नाही. आमच्या काळात शेतकऱ्यांना अधिक मदत झाली. तेवढी महाविकास आघाडीच्या काळात कधीही झालेली नाही, असे प्रत्युत्तर शिवसेनेचे प्रवक्ते तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिले आहे.
शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन आज सकाळी जोरदार टीका केली आहे. राज्यात अवकाळी पाऊस सुरु आहे. बळीराजा संकटात सापडला आहे. असे असताना मुख्यमंत्री मंत्रिमंडळासह अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत, असे म्हणत शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी
दीपक केसरकर यांनी अयोध्येतून शरद पवार यांनी केलेल्या टीकेवर पलटवार केला आहे. दीपक केसरकर म्हणाले, सातत्याच्या पाऊसाने हैराण असलेल्या शेतकऱ्याला मदत करण्याचा निर्णय आमच्याच काळात घेतला. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्याची योजना आम्ही आणली. भूविकास बँकेचा प्रश्न, तेथील कर्मचाऱ्यांचे प्रश्न आम्ही सोडवले.
आमचे काय चुकले?
दीपक केसरकर म्हणाले, शेतकऱ्यांची मदत कशी करायची हे आम्हाला शिकण्याची गरज नाही. आम्ही ते करुन दाखवले आहे. लोकांची सेवा करते ते रामराज्य. त्यामुळे आम्ही आराध्य दैवताच्या प्रभू श्रीरामांच्या दर्शनाला आलो त्यात आमचे काय चुकले, असा सवाल विचारतस केसरकर यांनी आम्ही शरद पवारांचा सल्ला नेहमीच ऐकतो शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांनी सांगावे, असा टोलाही लगावला.
काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत. येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी अयोध्या दौऱ्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हल्ला चढवला. अयोध्या दौऱ्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदुत्वाचा अजेंड प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. यावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले, आज अयोध्या दौरा महत्त्वाचा प्रश्न आहे का? राज्यात सध्याच्या घडीला अतिवृष्टी, गारपीट यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. कांदा, द्राक्ष उत्पादक हवालदील झाला आहे.
संबंधित वृत्त
शिंदे, फडणवीसांवर टीकास्त्र
राज्यात वादळी पाऊस, गारपीट असताना राज्याचे सर्व मंत्रिमंडळ अयोध्येला गेले आहे. राज्याचे, देशाचे मुख्य प्रश्न सोडवण्यची दृष्टी ज्यांच्याकडे नाही, असे लोक लक्ष विचलीत करण्यासाठी असे काही तरी प्रकार करतात, अशा शब्दांत राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला खडेबोल सुनावले आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.