आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षांतर:रश्मी ठाकरेंवर आरोप करून दीपाली सय्यद शिंदे गटात

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) दीपाली सय्यद यांनी बुधवारी शिंदे गटात जाणार असल्याची घोषणा केली. त्याचबरोबर त्यांनी रश्मी ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली. शिंदे आणि ठाकरे गटात दिलजमाईसाठी दीपाली यांनी प्रयत्न केले होते.

दरम्यान, सुषमा अंधारे शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आल्यापासून दीपाली सय्यद यांचे महत्त्व कमी झाले होते. त्याची सलही दीपाली सय्यद यांनी सुषमा अंधारे यांच्यावर केलेल्या टीकेतून दिसून आली आहे. ठाकरे गट सोडताना दीपाली सय्यद यांनी रश्मी ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत. बीएमसीतले खोके येणे बंद झाल्याची खंत रश्मी वहिनींना खूप वाटत आहे. नीलम गोऱ्हे किंवा सुषमा अंधारे या चिल्लर आहेत. या सर्वांच्या सूत्रधार रश्मी वहिनी आहेत, असा थेट आरोपही त्यांनी केला. त्याचबरोबर दीपाली यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही सडकून टीका केली. पक्ष तोंडामुळे कसा फुटू शकतो, हे राऊत यांनी दाखवून दिले आहे. शिंदे आणि ठाकरे असे दोन गट होण्यात सर्वात जास्त वाटा हा संजय राऊत यांचा असल्याचा आरोपही दीपाली सय्यद यांनी केला. संजय राऊत यांना झालेली शिक्षा ही त्यांच्या पापाची शिक्षा आहे, असे त्या म्हणाल्या. शिंदे यांनी मला शिवसेनेत आणले होते. त्यामुळे त्यांच्यासोबत जाणार असल्याचे सय्यद यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...