आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेक TRP प्रकरण:माजी पोलिस अधिकाऱ्याने अर्णब गोस्वामीविरोधात मानहानीचा खटला केला दाखल, रिपब्लिक टीव्हीच्या काही लोकांची आज चौकशी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चॅनलचे CFO, डिस्ट्रीब्यूशन हेड आणि एडिटरला क्राइम ब्रांचने बोलावले
  • CBI ने केस दाखल करण्यासाठी फेक TRP केसमध्ये उत्तर प्रदेशात दाखल केलेल्या तक्रारीचा घेतला आधार

प्रेसिडेंट पोलिस मेडल विजेता आणि पोलिसचे माजी असिस्टंट कमिशनर (ACP) इकबाल शेख यांनी अर्णब गोस्वामी विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. वकील आभा सिंहच्या माध्यमातून मुंबई शहर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. यासोबतच रिपब्लिक टीव्ही आणि अर्णब गोस्वामीवर बॅन लावण्याची मागणीही केली आहे.

तिकडे, फेक TRP केसमध्ये कांदिवली पोलिस स्टेशनमध्ये FIR दाखल करण्यात आला. याच प्रकरणाच्या तापासासाठी आज मुंबई क्राइम ब्रांचच्या ऑफिसमध्ये रिपब्लिक टीव्हीचा CFO एस सुंदरम, डिस्ट्रीब्यूशन हेड जी. सिंह आणि सीनियर एडिटर निरंजन नारायणस्वामीला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

'आपल्याच केसवर चॅनलवर चर्चासत्र घेऊ शकत नाही'
अर्णबच्या विरोधातील मानहानी केसमध्ये आज सुनावणी होऊ शकते. पिटीशनरने आरोप लावला आहे की, 'ज्यावेळी एका प्रकरणावर कायदेशीररित्या तपास सुरू आहे, तेव्हा बचाव पक्ष नंबर-1 (गोस्वामी) ला ही सूट दिली जाऊ शकत नाही की, ते आपल्याच केसविषयी आपल्याच चॅनलवर चर्चासत्र आयोजित करुन मुंबई पोलिसांना बदनाम करतील.'

तपासावर होऊ शकतो परिणाम
शेख यांनी आरोप लावला की, गोस्वामी वादग्रस्त डिबेट्स आणि स्टोरी टेलीकास्ट करत आहेत. यामुळे तपासावर परिणाम होऊ शकतो. अर्णबने दोन प्रसिद्ध चॅनल्सचा मालक असल्याच्या नात्यााने आपल्या सीमा पार केल्या आहेत आणि आपला अजेंडा सुरू केला आहे.

CBI नेही दाखल केली केस
फेक TRP प्रकरणात आता CBI ने केस दाखल केली आहे. तपास एजेंसीने केस दाखर करण्यासाठी उत्तर प्रदेशात दाखल करण्यात आलेल्या एका तक्रारीचा आधार घेतला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, रेटिंगमध्ये हेराफेरी झाल्याच्या आरोपानंतर FIR दाखल केल्यानंतर CBI ने लखनौ पोलिसांकडून तपासाची सूत्र हातात घेतली आहेत. रिपब्लिक टीव्ही सातत्याने CBI तपासाची मागणी करत होते.

आतापर्यंत 6 लोकांना झाली अटक
TRP स्कॅममध्ये मुंबई पोलिसांनी सहा लोकांना अटक केली आहे. ज्या घरांमध्ये टीव्हीला मॉनिटर केले जात होते त्यांच्या मालकांना एकच चॅनल पाहण्यासाठी पैसे दिले जात असल्याचा आरोप आहे.

3 चॅनल्सवर आरोप
मुंबई पोलिस कमिश्नर परमबीर सिंह यांनी तीन चॅनलवर TRP मॅनिपुलेट करण्याचा आरोप लावत केस दाखल केली आहे. रिपब्लिक टीव्ही त्या तीन चॅनलपैकी एक आहे. रिपब्लिक व्यतिरिक्त फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा चॅनलवरही आरोप आहेत. TRP कोणत्याही चॅनलसाठी गरजेची असते, कारण याच आधारावर त्यांना जाहिराती मिळत असतात.

बातम्या आणखी आहेत...