आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकालांवर भाष्य:भाजपला पराभूत करणे म्हणजे भितींवर डोके आपटण्यासारखे आहे, पाच राज्यांतील निवडणुकांच्या निकालावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहे. यामध्ये पाच राज्यातील निवडणुकांत पंजाब वगळता भाजपला मतदारांनी कौल दिला आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पार्टीला सत्ता स्थापन करण्यात यश मिळाले आहे. तर उत्तर प्रदेशात भाजपला बहुमत मिळत असल्याचे दिसत आहे. गोवा आणि उत्तराखंडमध्येही भाजपच पुढे चालत आहे. दरम्यान आता या निकालावर भाजपच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी या विजयावर प्रतिक्रिया दिली आहे.

याविषयी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'एक समजदार राजकीय नेता म्हणून मी निकालावर लगेच आपले मत मांडणे योग्य होणार नाही. मात्र, सध्या जे चित्र दिसत आहे, त्यावरुन 5 पैकी 4 राज्यांमध्ये भाजपचा विजय होईल हे स्पष्ट दिसत आहे. युपीमध्ये सर्व महिलांनी भाजपला मतदान केले असेल आणि पुरुषांनी समाजवादी पक्षाला. तसेच, भाजपला पराभूत करणे म्हणजे भिंतीवर डोकं आपटण्यासारखं आहे,' असा टोला देखील चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.

दरम्यान उत्तर प्रदेशचे राजकीय चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. एक्झिट पोलचे अंदाज बर्‍याच अंशी बरोबर असल्याचे दिसून येत आहे. योगी आदित्यनाथांनी आपला गड राखला आहे. तर अखिलेश यादव यांचे सत्ता स्थापनेचे स्वप्न भंगले आहे. तर देशातील सर्वात लहान राज्य असलेल्या गोव्यातील सांकेलीम मतदारसंघातून CM प्रमोद सावंत हे सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. सावंत यांनी भाजप 20 पेक्षा जास्त जागा जिंकत असल्याचं म्हटले आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या (MGP) मदतीने आम्ही सरकार स्थापन करणार आहोत असल्याचे त्यांनी सांगितले.

तर आम आदमी पक्षाने काँग्रेस, भाजप, अकाली दल या सर्वांना धुळ चारत पंजाबमध्ये निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. 36 जागांचे बहुमत असलेल्या उत्तराखंडमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपने बहुमताचा आकडा पार केला आहे. भाजप सध्या 43 जागांवर पुढे असून काँग्रेस 23 जागांवर आघाडीवर आहे. तर मणिपुरमध्येदेखील सत्तेत असलेल्या भाजपने यंदा सर्वच्या सर्व 60 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. यात भाजपला कितपत यश मिळेल, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र भाजपला आतापर्यंत 31 जागांवर आघाडी दिसत आहे.

बातम्या आणखी आहेत...