आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप महिला मोर्चा आक्रमक:खासदार संजय राऊतांविरोधात दिल्लीत गुन्हा दाखल; महिलांचा अपमान केल्याचा आहे आरोप

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना खासदार संजय राऊतांविरोधात भाजपच्या महिला मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्याविरोधात नवी दिल्लीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांचा अपमान केल्याप्रकरणी भाजपच्या महिला मोर्चाच्या दिप्ती रावत यांच्याकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावरून दिल्लीच्या मंडावली पोलिस स्टेशनमध्ये राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय सचिव दिप्ती रावत यांनी राऊतांविरोधात तक्रार दाखल केली होती. यानंतर नवी दिल्लीत त्यांच्यावर कलम 500 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संविधानिक पदावर असतानाही असभ्य भाषा वापरल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.

नेमके काय आहे प्रकरण?
संजय राऊतांनी माध्यमांसमोर वापरलेल्या अपशब्दांमुळे राजकीय वातावरण तापलेले आहे. संजय राऊतांचा शरद पवारांसोबतचा एक फोटो व्हायरल झाला होता. यानंतर भाजपकडून त्यांना ट्रोल करण्यात आले होते. यावर माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारल्यानंतर राऊत संतापले होते. राऊत म्हणाले होते की, मी लालकृष्ण अडवाणी जरी असते तरी देखील खुर्ची दिली असती. महाराष्ट्रातल्या एका पितृतुल्य व्यक्तीला मी खुर्ची आणून दिली. ही गोष्ट जर कुणाला आवडली नसेल तर ही महाराष्ट्राची संस्कृती नाही तर ही विकृती आहे. असे म्हणत राऊतांनी संताप व्यक्त केला होता आणि अपशब्दांचा वापर केला होता.

बातम्या आणखी आहेत...