आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्हीच असली बाकी सगळे नकली:शिंदेंच्या 200 जागा जिंकण्याच्या वक्तव्यामागे दिल्लीवाले; राज्यात आम्ही 100 जागा जिंकू-राऊत

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

''दोनशे जागा निवडून आणण्याची एकनाथ शिंदेंनी जबाबदारी घेतली आनंद आहे; पण हे बोल त्यांचे नसून दिल्लीवाल्यांचे आहे. तूम्ही काहीही बोला पण आम्ही शंभरपेभक्षा अधिक जागा राज्यात निवडून आणू.'' असा विश्वास शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. यासोबतच त्यांनी ''आमचीच खरी शिवसेना असून बाकी सगळे नकली आहे.'' असा टोलाही शिंदेंना लगावला.

शिवसेनेच्या चार लोकांची शिंदे गटाकडून बदनामी

राऊत म्हणाले, शिवसेनेच्या चार लोकांना बदनाम करण्याचा प्रयत्न शिंदे गट करीत आहेत. पणल हे चारही लोक शिवसेना पक्षाशी एकनिष्ठ आहेत. जे आरोप करतात त्यांनी लक्षात घ्यावे की, उद्धव ठाकरे दुधखूळे नाहीत, त्यांना सर्व माहित आहे. पक्ष सोडून जाणाऱ्यांना फक्त बहाणा लागतो. आदित्य ठाकरेंना सोडून इतरांना नोटीस दिल्या त्याबद्दल मला माहित नाही पण त्यांनी जे कारण दिले तसे पाहता ईतर 14 आमदारही बाळासाहेबांचेच चेले आहेत हे ते विसरले का? असा उलट सवालही राऊतांनी केला.

मार्ग निघणारच होता पण तूम्ही सोडून गेला

राऊत म्हणाले, कुणी सोडून गेले म्हणून बाळासाहेब ठाकरेंना मानणारा वर्ग सेनेतून गेला असे होत नाही. आपण आपली भूमिका वेगळ्या पद्धतीने मांडू शकला असता पण पक्षातून गेलात, मार्ग निघणारच होता. हे सांगत त्यांनी हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्यावर टीकास्त्र सोडले. आदल्या दिवशी मतदारसंघात बांगर रडत होते, दुसऱ्या दिवशी शिंदेसेनेत गेले. अशा लोकांना पुन्हा जनता निवडून देणार नाही असेही ते म्हणाले.

आम्हीच असली, बाकी नकली

राऊत म्हणाले, दोनशे आमदार निवडणून आणणार हे दिल्लीवाले सांगतात इथे काय होईल? आम्ही लढायला तयार, आम्हाला विश्वास आहे की, आम्ही शंभर जागा घेऊन विधानसभेत जाऊ. आमचीच खरी शिवसेना आहे बाकी नकली आहेत. ''पैसा नही मिला और भी कुछ मिला है'' हे ममता बॅनर्जींनी बंडखोर सरकारबद्दल म्हटले म्हणजे याचा अर्थ पैशांशिवाय आणखी काही तरी मिळाले असा आरोपही राऊतांनी केला.

भुजबळ, राणेंसारखीच शिंदेंबाबतही तीच भूमिका

राऊत म्हणाले, मी बाळासाहेबांच्या चरणांशी बसून काम केले. आता जे बोलत आहेत ते सोईचे बोलत आहेत. नारायण राणे गेले, छगन भुजबळ गेले तेव्हा बाळासाहेबांचीही उद्धव ठाकरे यांच्यासारखीच भूमिका होती.

शिंदे गटाचा व्हीप बेकायदेशिर

राऊत म्हणाले, शिंदे गटाचा व्हीप बेकायदेशिर आहे. विधानसभा अध्यक्षांनी हे तपासावे अन्यथा वकिलीची सनद परत करून कायदा पाहावा असे खडे बोलही राऊत यांनी सुनावले.

शिंदेंना जोरदार टोला

एकनाथ शिंदेंना विधानभवनात खुलासापर भाषण करावे लागले. शिवसेना सोडून गेलेल्यांना खुलासा द्यावाच लागतो पण केवळ भाषण करून जमत नसते तर लोकभावनेला हात घालावा लागतो असा टोलाही मुख्यमंत्री शिंदेंना राऊतांनी लगावला.

बातम्या आणखी आहेत...