आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Delivery In The First Week Of July; From Next Year Onwards, Two Individuals From Each Revenue Department Will Be Awarded To One Organization

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार:सहा वर्षांच्या पुरस्कारांचे जुलैच्या पहिल्या आठवड्यात एकत्रित होणार वितरण

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वीरशैव लिंगायत समाजाच्या विकासासाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती तसेच संस्थांना 'महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार देण्यात येतो. गेले सहा वर्षांचे पुरस्कार जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत वितरण होणार आहे. तर पुढच्या वर्षापासून या क्षेत्रात कार्य करणा-या प्रत्येक सात महसूली विभागातून दोन व्यक्ती व एक संस्थांची निवड केली जाणार आहे, अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व संघटनात्मक विकास होण्यासाठी राज्यातून एकूण 14 व्यक्ती आणि 7 संस्थांची या पुरस्कारासाठी निवड केली जाणार आहे. मागील सहा वर्षापूर्वी अर्थात 8 जून 2016 रोजी 'महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासंदर्भात शासन निर्णय काढला होता. त्यानंतर या सहाही वर्षाचे पुरस्कार वितरण झालेले नव्हते.

कोणाला मिळाला पुरस्कार?

2016-2017 चा पुरस्कार प्रा. मनोहर बाबाराव धोंडे आणि संस्था म्हणून शिवा आखिल भारतीय वीरशैव युवक संघटना,औरंगाबाद यांना पुरस्कार जाहिर झाला आहे. तसेच 2017-2018 चा पुरस्कार अभय मनोहर कल्लावार, नागपूर तर संस्था म्हणून वीरमठ संस्थान (ता. अहमदपूर, जिल्हा लातूर) 2018-2019 चा पुरस्कार नांदेड येथील विठ्ठल ताकबिडे, 2019-20 चा पुरस्कार उमाकांत गुरूनाथ शेटे (पुणे) तर संस्था म्हणून महात्मा बसवेश्वर सेवाभावी संस्था, (फुलकळस ता. पुर्णा, जिल्हा परभणी) यांना जाहीर झाला. 2020-2021 चा पुरस्कार रामलिंग बापूराव तत्तापूरे (लातूर) यांना तर तीर्थक्षेत्र आदीमठ संस्थान धारेश्वर, पोस्ट दिवशी खुर्द, ता. पाटण, जि. सातारा यांना जाहिर झाला. 2021-2022 चा व्यक्ती म्हणून डॉ. यशवंतराव बाबाराव सोनटक्के (नवी मुंबई) तर संस्था सारथी प्रतिष्ठान, शिवकृपा बिल्डींग,बसवेश्वर नगर नांदेड यांना जाहिर झालेला आहे. या सर्व वर्षांच्या व्यक्ती व संस्थाच्या पुरस्कारांचे वितरण जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.

हे आहे पुरस्काराचे स्वरुप

संस्था व व्यक्तीची निवड प्रत्येक विभागातून केली जाणार असून संस्थेला 51 हजार रोख व व्यक्तीला 25 हजार रूपये रोख रक्कम तसेच सन्मानचिन्ह,शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तरी या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाला या क्षेत्रात कार्य करणारे कलावंत, साहित्यिक, समाज प्रबोधनकार, समाज संघटक व समाजसेवक यांनी उपस्थित रहावे असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.याबाबतचा शासननिर्णय 13 जून 2022 रोजी नुकताच निर्गमित करण्यात आलेला आहे.

बातम्या आणखी आहेत...