आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात वाढला डेल्टा प्लसचा धोका:आतापर्यंत 5 जणांनी गमावला जीव, जळगावात सर्वात जास्त 13 रुग्ण आढळले; लसींचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच मिळणार राज्यात एंट्री

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला लसीचे दोन्ही डोस लावणे आवश्यक असेल

कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या वाढत्या धोक्यात 15 ऑगस्टपासून महाराष्ट्रात अनलॉक 3.0 सुरू होत आहे. व्हायरसच्या 'डेल्टा प्लस' प्रकारामुळे आतापर्यंत राज्यात 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी एक मुंबईचा, 2 रत्नागिरीचे, एक बीडचा आणि एक रायगडचा आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व मृतांचे वय सुमारे 65 वर्षे आहे. यापैकी 2 लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते. तर दोघांनी प्रत्येकी एक डोस घेतला होता. राज्यात आतापर्यंत डेल्टा प्लस व्हेरिएंटची एकूण 66 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या 13 प्रकरणांसह जळगाव जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे, त्यानंतर 12 प्रकरणांसह रत्नागिरी जिल्हा आणि 11 प्रकरणांसह मुंबईचा क्रमांक आहे. दरम्यान राज्यात समोर आलेल्या 66 प्रकरणांपैकी 32 रुग्णांना आराम मिळाला आहे. तर उर्वरित महिला होत्या. तर सात रुग्णांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी होते.

या धोक्यादरम्यान महाराष्ट्रात प्रवेशाच्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. नवीन आदेशानुसार, राज्यात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला लसीचे दोन्ही डोस लावणे आवश्यक असेल. लसीच्या दोन डोसमध्ये 14 दिवसांचे अंतर असणे देखील आवश्यक आहे. तसेच, याचा पुरावा म्हणून तुम्हाला तुमच्यासोबत प्रमाणपत्राची प्रत जोडावी लागेल. जर लस उपलब्ध नसेल, तर त्या प्रकरणात आरटी-पीसीआर अहवाल दाखवणे आवश्यक असेल. नियमांचे पालन न झाल्यास महाराष्ट्रात 14 दिवसांसाठी क्वारंटाइन राहावे लागेल.

15 ऑगस्टपासून राज्यात सूट

  • मॉल, रेस्टॉरंट्स 50 टक्के क्षमतेसह रात्री 10 पर्यंत खुले राहण्याची परवानगी असेल. तसेच सर्व कर्मचाऱ्यांना पूर्णपणे लसीकरण करण्याची अट असेल.
  • दुकाना देखील रात्री 10 वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
  • स्पा आणि जिमला देखील या अटींवर 50 टक्के क्षमतेसह रात्री 10 वाजेपर्यंत संचालित करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
  • खुल्या ठिकाणांवर होणाऱ्या लग्नांमध्ये 200 लोकांना सामिल होण्याची परवानगी असेल. तर बंद हॉल इव्हेंटमध्ये, 100 लोक किंवा स्थळाच्या क्षमतेच्या 50 टक्के लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाईल.

सिनेमा हॉल बंद राहणार
इनडोर खेळांना परवानगी असेल, मात्र सिनेमा हॉल आणि प्रार्थना स्थळे पुढील आदेशापर्यंत बंद राहणार.

बातम्या आणखी आहेत...