आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेल्टा व्हेरिएंट महाराष्ट्रासाठी घातक:भारतात डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, देशात सापडलेल्या डेल्टा प्लसच्या एकूण 41 प्रकरणांपैकी 21 एकट्या महाराष्ट्रात

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना व्हायरसच्या नवीन डेल्टा व्हेरिएंटने भारतासह जगात चिंता वाढवली आहे. भारत आणि अमेरिकेतील तज्ज्ञांनी तर 24 तासात या नवीन व्हेरिएंटवर इशारा दिला आहे. भारतात हाच डेल्टा प्लस व्हेरिएंट कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी जबाबदार ठरू शकतो. अमेरिकेतील सर्वात प्रसिद्ध महामारी तज्ज्ञ अँथनी फौची याची देखील अशाच स्वरुपाचा इशारा दिला आहे.

फौची यांच्या मते, अमेरिकेत कोरोनाविरुद्धच्या लढ्यात डेल्टा व्हेरिएंट सर्वात घातक आहे. डेल्टाच्या मूळ व्हेरिएंटच्या तुलनेत ओरिजिनल नवीन व्हेरिएंट झपाट्याने फैलावतो. या व्हेरिएंटमुळे परिस्थिती गंभीर होऊ शकते.

लसीकरणाबाबत जनजागृती करताना अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन
लसीकरणाबाबत जनजागृती करताना अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन

लसीकरणावर लक्ष केंद्रित करण्याची गरज
फौची पुढे म्हणाले की फायजरसह अनेक कंपन्यांचे व्हॅक्सीन अमेरिकेत दिले जात असून त्या सर्वच व्हेरिएंटवर प्रभावी आहेत. आपल्याकडे संक्रमण थांबवण्यासाठी व्हॅक्सीनेशन ही पद्धत आहे, त्याचा वापरही करायला हवा. अर्थातच लसीकरणाचे लक्ष्य लवकरात लवकर साध्य करावे. अमेरिका सरकारचे वरिष्ठ सल्लागार जेफरी जेंट्स यांनी सांगितले, की 4 जुलै पर्यंत 70% युवा जनतेच्या लसीकरणाचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. पण, त्या लक्ष्यापासून आपण दूर आहोत. याला आणखी काही आठवडे लागू शकतात.

डेल्टा प्लसच्या एकूण 40 प्रकरणांपैकी 21 एकट्या महाराष्ट्रात
भारतात तिसऱ्या लाटेसाठी डेल्टा प्लस व्हेरिएंट जबाबदार ठरू शकतो. तज्ज्ञांनी हा धोका लक्षात घेता महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि केरळ या तीन राज्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारीच सांगितले, की जगातील 9 देशांमध्ये हा व्हेरिएंट आहे. भारतात डेल्टा प्लस व्हेरिएंटने कोरोना झाल्याची 40 प्रकरणे समोर आली आहेत. यातील सर्वाधिक 21 प्रकरणे महाराष्ट्रात आहेत. उर्वरीत प्रकरणे केरळ, तामिळनाडू, पंजाब आणि मध्य प्रदेशात नोंदवण्यात आले.

डेल्टा प्लस व्हेरिएंट नेमके काय?
कोरोनाच्या व्हायरसमध्ये झालेल्या बदलास विविध नावे देण्यात आली आहेत. देऊन भारतात सापडलेल्या कोरोना व्हायरसच्या डबल म्यूटंट स्ट्रेन B.1.617.2 ला जागतिक आरोग्य संघटनेने डेल्टा व्हेरिएंट असे नाव दिले. B.1.617.2 मध्ये आणखी एक म्यूटेशन K417N झाले आहे. हा व्हेरिएंट यापूर्वीच्या बीटा आणि गामा व्हेरिएंटमधूनच आहे. यातूनच तयार झालेल्या नवीन व्हेरिएंटला डेल्टा प्लस किंवा AY.1 आणि B.1.617.2.1 असे म्हटले जात आहे. K417N म्यूटेशन झालेले नवीन व्हेरिएंट आधीच्या व्हायरसच्या तुलनेत वेगाने पसरते. यावर व्हॅक्सीन आणि औषधींचा प्रभाव सुद्धा कमी पडतो.

बातम्या आणखी आहेत...