आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सराफ्यातील कल:सोन्याची मागणी 37% वाढली, बिस्कीट-नाण्याने विक्रम मोडला

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जानेवारी-मार्च तिमाहीत सोने आयात 301 टन

सोन्यासाठी २०२१ शानदार सिद्ध होत आहे. जानेवारी-मार्चदरम्यान देशात सोन्याची मागणी ३७% वाढून १४० टन झाली आहे. या दरम्यान बिस्कीट आणि नाण्याची मागणी गेल्या ६ वर्षांत सर्वात जास्त राहिली. येत्या तिमाहीतही अशी स्थिती राहू शकते. यामुळे किंमत वाढण्याची शक्यता आहे. ही ४७,००० रु. प्रति १० ग्रॅमच्या आसपास आहे. वर्ल्ड गोल्ड काैन्सिलच्या अहवालानुसार, जानेवारी-मार्च २०२१ दरम्यान भारतात १४.८० टन सोने पुनर्प्रक्रिया होऊन बाजारात आले. गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत १८.५० टन सोने रिसायकलिंग झाले होते. याच पद्धतीने या प्रकरणात २०% ची घसरण आली. या दरम्यान देशात सोन्याची आयात २६२ टक्के वाढली आहे. डब्ल्यूजीसीचे एमडी(भारत) सोमसुंदर पी.आर. यांनी सांगितले की, भारतात सलग तिसरी तिमाही रिटेल गुंतवणुकीसाठी सोन्याच्या मागणीत सुधारणा दिसली.

दुपटीपेक्षा जास्त सोने आयात
२०२१च्या पहिल्या तिमाहीत १४० टन सोन्याच्या मागणीच्या तुलनेत ३०१ टन आयात झाली. जाने-मार्च २०२० मध्ये ८३.१ सोन्याची आयात झाली तर मागणी १०२ टन होती.

यामुळे वाढली सोन्याची मागणी
- जानेवारी-मार्च तिमाहीत सोन्याची किंमत सरासरी ४७,१३१ रु. प्रति १० ग्रॅम राहिली, जी ऑक्टोबर-डिसेंबरच्या तुलनेत ६% कमी आहे.
- ऑगस्ट,२०२० च्या तुलनेत ही किंमत १६% कमी आहे. देशांतर्गत बाजारात सोने ५६,००० रु. प्रति १० ग्रॅमच्या उच्च पातळीवर होते.
- यादरम्यान देशात कोविड बचावासाठी सरकारकडून लसीकरणाची सुरू झाली आणि लग्नसराई सुरू झाली.
- गेल्या लॉकडाऊनमुळे जे दागिने खरेदी करू शकले नाहीत, त्यांनी ऑगस्टनंतर केली खरेदी.

बातम्या आणखी आहेत...