आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याची मागणी; पोहरादेवीच्या महंतांनी घेतली मुख्यमंत्री ठाकरेंची भेट

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी वनमंत्री व दिग्रसचे शिवसेना आमदार संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान द्यावे, या मागणीसाठी पोहरादेवीच्या महंतांनी शुक्रवारी (१७ जून) रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. संजय राठोडांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देऊन बंजारा समाजाला न्याय द्या, अशी मागणी बंजारा समाज महंतांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

पोहरादेवी येथील महंत बाबूसिंग राठोड, मेहताब सिंग नाईक, अॅड. अभय राठोड, पोपट चव्हाण यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. पोहरादेवीच्या महंतांनी मागच्या आठवड्यात पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली होती तसेच राठोड यांच्यावर पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी दाखल गुन्ह्याची माहिती घेतली होती. पुणे पोलिसांनी पूजा चव्हाण आत्महत्या आकस्मित घडली असल्याचा निष्कर्ष काढला असून तसे समरी पत्र बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाला दिले होते. त्यानंतर काल बंजारा समाजातील महंतांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन संजय राठोड यांना पुन्हा राज्य मंत्रिमंडळात स्थान द्यावे, अशी मागणी केली. भेटीनंतर महंत बाबूसिंग महाराज म्हणाले की, संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यात यावे, यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो. मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान देण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...