आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधन वार्ता:लोकशाहीर कॉ. अमर शेख यांच्या पथकातील केशर चाँद यांचे निधन

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकशाहीर काॅ. अमर शेख यांच्या कला पथकातील सहकारी शाहिरा केशर जैन चाँद यांचे सोमवारी ( ५ डिसेंबर ) पहाटे सात रस्ता, महालक्ष्मी मुंबई येथील राहत्या घरी वृद्धापकाळने ७८ व्या निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा शाहीर निशांत, सून, नातवंडे असा परिवार आहे. दिवंगत शाहिरा केशर जैनू चाँद यांचा अंत्यसंस्कार बौद्ध पद्धतीने वरळी, माता रमाबाई आंबेडकर स्मशानात दुपारी पार पडला. शाहिरा केशर जैनूू चाँद यांनी लोकशाहीर काॅ. अमर शेख, लोकशाहीर काॅ. अण्णा भाऊ साठे यांच्यासोबत व पती शाहीर जैनू चाँद यांच्यासोबत संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत, गिरणी कामगारांच्या चळवळीत सांस्कृतिक प्रबोधनाचे मोठे कार्य केले होते.अलीकडेच लोकशाहीर काॅ. अमर शेख यांच्या स्मृतिदिनी २९ सप्टेंबर रोजी शिवाजी मंदिर येथे दलित पँथर सुवर्णमहोत्सव समितीतर्फे त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून विशेष सत्कार करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...