आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्र्यांच्या सरकारमधील आमदारांना मस्ती चढली आहे. कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी ज्यांची आहे तेच ती बिघडवत आहे. सुर्वे म्हणतात, टेबल जामिन देतो. संतोष बांगर धमक्या देतो. सदा सरवणकर पिस्तूलातून गोळ्या झाडतो पण कारवाई होत नाही, आम्ही जशास तसे उत्तर देणारे आहोत असा इशारा विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी आज दिला.
विजयादशमीनिमित्त शिवसेनेचा मेळावा आज सायंकाळी दादरच्या शिवाजी पार्कवर झाला. या मेळाव्यात अंबादास दानवेंनी संबोधन केले.
शिंदे सरकारच्या योजना पोकळ
अंबादास दानवे म्हाले, मी शिवतीर्थावर समोर बसून भाषण ऐकले आज मी व्यासपीठावर संबोधित करतोय ही शिवसेनेची ताकद आहे. सरकार जनतेप्रती असंवेदनशिल आहे. ठाकरे सरकारने गतवर्षी अतिवृष्टीनंतर ठाकरे सरकारने भरघोस मदत दिली. पण शिंदे-भाजप सरकारने केवळ तीन हजार चारशे कोटींची घोषणा केली पण शेतकऱ्यांना प्रत्यक्षात लाभ मिळाला नाही.
शिंदे गटातील आमदारांना मस्ती चढली
अंबादास दानवे म्हणाले, बुलेट ट्रेनला पैसे मिळतात पण शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहचत नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या सरकारमधील आमदारांना मस्ती चढली आहे. कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी ज्यांची आहे तेच ती बिघडवत आहे. सुर्वे म्हणतात, टेबल जामिन देतो. संतोष बांगर धमक्या देतो. सदा सरवणकर पिस्तूलातून गोळ्या झाडतो पण कारवाई नाही.
पोलिसांतही हरामखोराची अवलाद
अंबादास दानवे म्हणाले, पोलिसांमध्येही हरामखोराची अवलाद पैदा होत असते. एक नवी मुंबईचा डीसीपी शिंदे गटात येण्यासाठी एनकाऊंटर करण्याची धमकी देतो. मी त्यांना इशारा देतो की, आज सत्ता तुमची उद्या आमची असेल लक्षात ठेवा.
गरीब अन्यधान्य योजनेची चौकशी करा
अंबादास दानवे म्हणाले, अब्दुल सत्तार कट्टर हिंदुत्ववादी म्हणतात, पण तेच सत्तार औरंगजेबाचे नाव शिवणा गावातील चौकात देतात. फुकट घरपोच अन्यधान्य द्या. शंभर रुपये कसले घेता. मुख्यमंत्र्यांच्या गरीब अन्यधान्य योजनेच्या टेंडरची चौकशी करा.
माझ्याकडे उद्धव ठाकरे आहेत
अंबादास दानवे म्हणाले, काही लोकांनी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांशी गैरवर्तन झाले. त्यांनी मात्र अशांचे थोबाड फोडले म्हणजेच शिवसेना जशास तसे उत्तर देते हे लक्षात घ्या. समोरचे आमदार म्हणातात की, आमच्याकडे पन्नास खोके आहे. गुवाहाटी, सुरत आहे. पण माझ्याकडे उद्धव ठाकरे आहेत हे लक्षात ठेवा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.