आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीईटी EXAM:उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून CET परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्विट करुन दिली माहिती

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उच्च व तंत्र शिक्षण विभागकडून घेतल्या जाणाऱ्या CET परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. NEET परीक्षा त्यासोबतच JEE परीक्षा यांच्या तारखांचा विचार करून या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. असे शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले होते. वेळापत्रकाच्या तारखा आल्या असून परिक्षेची संबंधित माहिती संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.

यापूर्वी, एमएचटी CET 2022 3 ते 12 जून 2022 या कालावधीत होणार होती. तथापि, महाराष्ट्र सरकारने परीक्षेच्या तारखेत बदल केला आहे. उदय सामंत यांनी त्यांच्या ट्विटर पोस्टवर लिहिले की, “JEE आणि NEET परीक्षांमुळे CET परीक्षा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. BE, BTech, BPharm किंवा DPharm अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी MHT CET आयोजित केली जाते. ही परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (PCB) आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (PCM) या गटांमध्ये घेतली जाते. CET चा पेपर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. 80 टक्के अभ्यासक्रम हा इयत्ता 12 वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल.

असे आहे CET परिक्षेचे वेळापत्रक

बातम्या आणखी आहेत...