आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे मेट्रो:पुन्हा एकदा भल्या पहाटे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पुणे मेट्रो कामाची पाहणी, 6 वाजताच झाले हजर

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुण्यात पिंपरी चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गांचे काम महा मेट्रोमार्फत सुरू आहेत.

उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे सध्या अॅक्शनमोडमध्ये दिसत आहे. त्यांनी आज भल्या पहाटे पुणे मेट्रो कामाकाजाची पाहणी केली. गेल्या आठवड्यातही त्यांनी अशीच पुणे मेट्रो कामाची भल्या पहाटेच पाहणी होती. या कामावर ते बारीक लक्ष ठेवून असल्याचे दिसत आहे.

अजित पवारांनी पाहणी केल्यानंतर त्यांनी मेट्रोचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचनाही यंत्रनेला दिल्या आहेत. गेल्या आठ दिवसांत अजित पवारांनी दुसऱ्यांदा पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी केली आहे. त्यांनी आज पुणे स्टेशन, व्हील पार्क डेपो, शिवाजीनगर कृषी महाविद्यालय येथे पाहणी केली आणि मेट्रोच्या कामाचा संपूर्ण आढावा घेतला. अजित पवार येणार म्हटल्यावर मेट्रोचे अधिकारीदेखील झाडून उपस्थित होते.

पुण्यात पिंपरी चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मार्गांचे काम महा मेट्रोमार्फत सुरू आहेत. यामधील पुणे स्टेशन येथील सुरू असलेल्या कामाचा आढावा अजित पवारांनी दुसऱ्यांदा घेतल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांना महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी मेट्रोच्या सुरु असलेल्या कामाबाबत सविस्तर माहीती दिली.

बातम्या आणखी आहेत...