आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी घोषणा:राज्यातील एमपीएससी परीक्षेच्या सर्व रिक्त जागा 31 जुलैपर्यंत भरणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे थांबली प्रक्रिया - पवार

स्वप्निल लोणकर यांची आत्महत्या अतिशय वेदनादायी असून ही घटना कोणासोबतही घडू नये, अशी सरकारची भूमिका असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. ते आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात बोलत होते. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली. राज्यातील राज्य सेवा परीक्षेची सर्व रिक्त जागा 31 जुलैपर्यंत भरणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

भाजप नेत्यांनी केले होते प्रश्न उपस्थित
पुण्यातील तरुण स्वप्निल लोणकर याच्या आत्महत्येचे पडसाद आज राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उमटले. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी लोणकर कुटुंबियांनी मदत करण्याची मागणीही यावेळी केली. त्यासोबतच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससी परीक्षेच्या मुद्यांवरुन राज्य सरकारकचे लक्ष वेधले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे थांबली प्रक्रिया - पवार
विरोधी पक्षाच्या प्रश्नांचे उत्तर देताना पवार म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग (एसईबीसी) 9 सप्टेंबर 2020 रोजी स्थगिती दिल्याने राज्यातील एमपीएससीची सर्व प्रक्रिया थांबवावी लागली. त्यासोबतच राज्यात कोरोनाचे निर्बंध असल्याने या परीक्षा घेता आल्या नसल्याचे पवार यांनी विधिमंडळात सांगितले.

बातम्या आणखी आहेत...