आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधानांना पत्र:सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्याय तात्काळ थांबवून तेथील गावे महाराष्ट्रात सामील करा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पंतप्रधानांना पत्र

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र हे प्रत्येक महाराष्ट्रवासियाचे स्वप्न आहे, हा महाराष्ट्र सरकार व जनतेचा दृढनिर्धार आहे.

सीमाभागात मराठी भाषिकांवर होणारा अन्याय तात्काळ थांबवून तेथील गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे या पत्राद्वारे केली आहे.

अजित पवारांनी पत्रात लिहिले की, 'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन होऊन साठहून अधिक वर्षे झाली तरीही, बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील शेकडो मराठी भाषिक गावे अजूनही महाराष्ट्रबाहेर आहेत. सीमाभागातील मराठी भाषकांवर कर्नाटक सरकारकडून सातत्याने अन्याय होत आहे. कर्नाटक सरकारची कृती अन्यायकारक व मानवताविरोधी आहे. सीमाभागात मराठी भाषकांवर होणारा अन्याय तात्काळ थांबवून तेथील गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा. अशी मागणी अजित पवारांनी पत्राद्वारे केली.

बेळगाव, कारवार, बिदर, भालकी, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र हे प्रत्येक महाराष्ट्रवासियाचे स्वप्न आहे, हा महाराष्ट्र सरकार व जनतेचा दृढनिर्धार आहे. तो पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही. विधायक मार्गाने न्यायासाठीचा लढा सुरू राहणार असल्याचे देखील अजित पवार म्हणाले.

सीमाप्रश्नाची लढाई ही महाराष्ट्राच्या वतीने जनतेच्या मनात आणि सर्वोच्च न्यायालयात लढली जात आहे. सीमाभागातील मराठी भाषकांची आणि महाराष्ट्राची बाजू न्यायोचित असल्याने दोन्ही ठिकाणी महाराष्ट्राचाच विजय होईल, अशी खात्री आहे. सदर प्रश्न आपल्या माध्यमातून तातडीने मार्गी लागावा व सीमाभागातील मराठी बांधवांना लवकर न्याय मिळावा, यासाठी सीमाभागातील मराठी नागरिक लाखो पत्रे लिहून आपणाकडे विनंती करत आहेत. महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री या नात्याने मी देखील सीमाभागातील मराठी बांधवांच्या मागणीला पाठिंबा देत आहे, आपण नराठी भाष बांधवांची मागणी मान्य करावी अशी विनंती अजित पवारांनी पत्राद्वारे केली आहे.

बातम्या आणखी आहेत...