आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बजेट 2021 वर प्रतिक्रिया:शास्त्रज्ञांनी जीवनदान दिले पण अर्थसंकल्पाने देशातील जनतेला मरणाच्या वाटेवर नेले; अजित पवारांची टीका

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्रावरील अन्याय दूर करावा, यासाठी सर्वपक्षीय खासदारांनी अर्थमंत्र्यांना भेटावे, अजित पवारांचे आवाहन

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा आर्थिक अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावरून अजित पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. शास्त्रज्ञांनी कोरोनाची लस शोधून देशवासीयांना जीवनदान दिले, मात्र केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाने देशातील जनतेला पुन्हा एकदा मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवले, असे म्हणत अजित पवार यांनी बजेटवरून अर्थसंकल्पावर हल्लाबोल केला. तसेच दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपासून ते गेल्या कोरोनाकाळात रोजगार गमावलेल्या कोट्यवधी युवकांच्या पदरी निराशाच पडली आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मुंबई, पुण्यासह महाराष्ट्राच्या वाट्याला अर्थसंकल्पातून भरीव काहीही आले नाही. त्यामुळे महाराष्ट्रावरील केंद्राचा आकस पुन्हा एकदा दिसून आला आहे. असे पवार म्हणाले. महाराष्ट्रावरील अन्याय दूर करावा, यासाठी सर्वपक्षीय खासदारांनी अर्थमंत्र्यांना भेटावे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...