आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात कोकणावर सर्वाधिक अन्याय झाला. युतीच्या काळात आम्ही कोकणासाठी ज्या योजना आणल्या होत्या त्या गेल्या अडीच वर्षांत बंद करण्यात आल्या, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. मंगळवारी गोरेगाव येथे स्वराज्य भूमी कोकण महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, ठाकरे यांच्या काळात कोकणावर मोठा अन्याय झाला, हे दुर्दैव आहे. मात्र, आता आम्ही कोकणाच्या विकासाला गती देणार आहोत. कोकणात आम्ही मोठे प्रकल्प आणू, असेही त्यांनी सांगितले. फडणवीस म्हणाले, गेल्या अडीच वर्षांत कोकणावर अन्याय झाला. यामुळेच आता कोकणात आम्ही रिफायनरी करून दाखवू. कोकणी माणसाच्या हाताला काम देऊन दाखवू, हा आमच्या सरकारचा निर्धार आहे. महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, फणस जसा बाहेरून काटेरी व आतून गोड असतो, त्याचप्रमाणे कोकणातला माणूस आहे. मात्र, हा माणूस गोड असला तरी एकदा ठरवले की, तो आरपारची लढाईही लढतो. दरम्यान, फडणवीस यांच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे गटाने टीका केली आहे.
आम्ही रिफायनरी प्रकल्प कोकणामध्ये आणणारच आम्ही कोकणात जो रिफायनरी प्रकल्प आणणार आहोत, तो ग्रीन रिफायनरी प्रकल्प असेल. यामुळे कोकणातील प्रदूषण वाढणार नाही. ग्रीन रिफायनरी प्रकल्पातून कोणतेही उत्सर्जन नाही, असे तंत्रज्ञान वापरणार आहोत. ५ हजार एकरात यासाठी फक्त ग्रीनरी तयार करावी लागेल, असा नियमही करण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.