आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Deputy Cm Devendra Fadanvis Critisize To Mahavikas Agahdi | Devendra Fadnavis; He Said He Could Not Finish It Even Then And He Will Never Finish It

'मविआ'ने मला संपवण्याचा प्रयत्न केला:उपमुख्यमंत्री फडणवीसांचा गंभीर आरोप; म्हणाले - ठाकरेंचे भाषण निराशेचे अरण्यरुदन

मुंबई5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडीने गेल्या अडीच वर्षांत मला संपवण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप गुरुवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

उद्धव ठाकरे यांचे कालचे गटप्रमुख मेळाव्यातील भाषण म्हणजे निराशेचे अरण्यरुदन होते, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

मला संपवू शकणार नाही...

उद्धव ठाकरे यांनी काल फडणवीसांवर घणाघाती टीका करताना देवेंद्र फडणवीस यांच्या आयुष्यातली ही शेवटची निवडणूक असल्याचे म्हटले होते. या वक्तव्याचा समाचार घेताना फडणवीस म्हणाले की, कालचे भाषण हे नैराश्यातून होते. उद्धव ठाकरे भाषणात म्हणाले की, ही माझी शेवटची निवडणूक आहे. महाविकास आघाडीने 2019 मध्ये माझा शेवट करण्याचा प्रयत्न केला. पण मला कोणीही संपवू शकत नाही, या पुढेही संपवू शकणार नाही.

पाठीत खंजीर खुपसला

शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्या उद्धव ठाकरे यांनी भाजपला आव्हान देत म्हटले होते की, हिंमत असेल तर महिन्याभरात निवडणुका घ्या. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, आम्ही कायदेशीरपणे निवडून आलो आहे. मात्र, ज्यावेळी आमच्यासोबत निवडून येऊन तुम्ही आमच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यावेळी तुम्ही राजीनामे का दिले नाहीत. त्यावेळी का निवडणुका घेतल्या नाहीत? असे थेट सवाल फडणवीसांनी विचारला आहे.

मोदींच्या फोटोंनी निवडून आलेत

पुढे फडणवीस म्हणाले, शिवसेना मोदींचा फोटो लावून निवडून आली. तुमच्यात हिंमत होती तर त्यांनी त्यावेळी राजीनामे देऊन राष्ट्रवादी, काँग्रेससोबत निवडून यायचे होते, असे उत्तरही त्यांनी दिले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या कालच्या सभेने पुन्हा एकदा राजकारण ढवळून निघाले आहे. आता दसरा मेळाव्यात ते पुन्हा एकदा भाजपला जोरदार उत्तर देऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...