आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंजय राऊत यांच्यावरील कारवाई ही पुराव्याच्या आधारे झाली आहे. तपास यंत्रणांनी जी काही कारवाई केली आहे, ते आता कोर्टात ठरेल. त्यामुळे मला त्यावर काहीही बोलायचे नाही, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली.
योजनांचा आढावा
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडली असून, आजच्या बैठकीमध्ये केंद्र सरकारकडून राज्यात राबवणाऱ्या योजनांवर चर्चा करण्यात आली. काही योजनांचे काम अतिशय चांगल्या प्रकारे झाले असून, काही योजना मात्र, मागे पडल्या आहेत. उदा. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना ही 76 टक्के झाली असून, मात्र शहरी आवास योजना केवळ 12 टक्के झाली आहे. 17 लाख घरांचे टार्गेट असताना अडीच वर्षात केवळ 12 टक्केच घरे बांधण्यात आली आहे. त्यामुळे शहरातल्या गरीबाला केंद्र सरकारचे पैसे असतानाही घर मिळू शकलेले नाही.
पुढत्या रणनीतीवर चर्चा
राज्यातील इतर योजना कशा प्रकारे लवकरात लवकर राबवण्यात येतील, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आजच्या बैठकीत प्रत्येक विभागाच्या अडचणी समजून घेण्यात आल्या असून, पुढची रणनीती देखील ठरली आहे. केंद्राने दिलेला पैसा जास्तीत जास्त खर्च कसा करता येईल, जेणेकरुन सामान्य माणसाला लाभ मिळायला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे, असेही फडणवीस म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.