आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Deputy Speaker Neelam Gorhe's Suggestion To The Government To Investigate And Take Action Against Those Who Declared 'Aurangzeb Was Your Father...'

उपसभापती नीलम गोऱ्हे यांची सरकारला सूचना:‘औरंगजेब तुमचा बाप होता...’ घोषणा देणाऱ्यांवर पडताळून कारवाई होणार

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराविरोधात एमआयएमने केलेल्या आंदोलनात ज्यांनी औरंगजेबाचे पोस्टर दाखवले तसेच “औरंगजेब तुमचा बाप होता...’ असा नारा दिला त्यांची चौकशी केली जाईल. अशा समाजकंटकांवर एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्याची शक्यता पडताळून निर्णय घेण्याच्या सूचना राज्य सरकारला विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या उपोषणस्थळावर बिर्याणी देण्यात येत आहे, रात्री १० ते १२ या वेळेत औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या जात आहेत, असे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत सांगितले. सामान्य लोकांच्या आंदोलनाला १५ मिनिटेही पोलिस परवानगी देत नाहीत. मात्र, येथे एका पक्षाचे लोक ४ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. यामध्ये औरंगजेबाचा गौरव केला जात आहे. त्यामुळे अशा लोकांवर सरकारने कारवाई करावी, अशी मागणी दानवे यांनी केली.

..तर ‘देशद्रोह’चा गुन्हाही होऊ शकतो : पाटील ज्या दिवसापासून केंद्र सरकारने औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यास मान्यता दिली आहे त्या दिवसापासून काही लोक आक्षेपार्ह पद्धतीने आंदोलन करत आहेत. या प्रकरणाची नीट चौकशी झाली तर हा ‘देशद्रोह’चा गुन्हाही दाखल होऊ शकतो. पण अशी कारवाई अजून खूप दूर आहे, अशी माहिती संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या वेळी बोलताना दिली.

वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करावी : गोऱ्हे सरकारने ही बाब विचारात घेतली ही चांगली गोष्ट आहे. हे एक संपूर्ण मोठे षड््यंत्र दिसते. अशा प्रकरणांमध्ये कडक कायदेशीर कलमे लावली जातात, पण या प्रकरणात गरज भासल्यास एमपीडीएसारखा कायदाही लावला पाहिजे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करून, संपूर्ण प्रकरणाचे तार कोणाशी जोडलेले आहे याची चौकशी करण्यात यावी.

बातम्या आणखी आहेत...