आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हायरल व्हिडिओवर फडणवीस:करुणा शर्मा यांच्या कारमध्ये पिस्तुल ठेवल्याचा दावा, देवेंद्र फडणवीस म्हणाले- या प्रकरणाची कुठल्याही दबावाशिवाय चौकशी व्हायला हवी

मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • करुणा शर्मा यांनी रविवारी परळी दौरा केला.

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनमध्ये राहिल्यानंतर त्यांच्यापासून वेगळे होत न्यायालयीन लढाई सुरू असलेल्या करुणा शर्मा यांनी रविवारी परळी दौरा केला. मात्र त्यांचा दौरा वादग्रस्त ठरला आहे. त्यांच्या वाहनात पिस्तुल सापडली असल्याने मोठा वाद झाल्याचे पाहायला मिळाले. नंतर ही पिस्तुल कोणी तरी गाडीत ठेवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आता या सर्व प्रकरणावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.

कारमध्ये पिस्तुल ठेवल्याच्या व्हिडिओविषयी बोलताना फडणवीस म्हणाले की, 'करुणा शर्मा यांच्या कारमध्ये पिस्तुल ठेवल्याचा व्हिडिओ समोर आला. त्यानंतरच पिस्तुल सापडल्याचा दावा केला जात आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. याची सखोल चौकशी व्हायला हवी. या प्रकरणात चौकशी होत असताना कुठल्याही प्रकारचे दबाव आणता कामा नये' असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

शर्मा यांच्या वाहनाच्या डिकीत एक महिला काहीतरी वस्तू ठेवत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्याच डिकीत पिस्टल आढळल्याने ठेवलेली ती वस्तू पिस्तुल होती का, वस्तू ठेवणारी ती महिला कोण, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अवघ्या 4 सेकंदांत त्या महिलेने ती वस्तू ठेवली. आजूबाजूला पोलिस कर्मचारी असुन देखील तिला कुणी अडवले कसे नाही, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...