आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीसांची संजय राऊतांवर टीका:म्हणाले- नखं कापून शहीद होण्याचा काहींचा प्रयत्न; कायद्याने उत्तर द्या, मराठी माणसाला लुटणारे कोण ते आता कळले!

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज भारतीय जनता पार्टीचा 42 वा स्थापना दिवस असून, राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व भाजप कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. त्यानंतर त्यांनी संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवर देखील त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, कायद्याने उत्तर द्या, भावनात्मक उत्तर देऊन लोकांचा त्यावर विश्वास बसणार नाही. ईडीकडे काहीतरी पुरावा असेल, त्यामुळेच त्यांनी नोटीस आणि कारवाई केली असेल. नखं कापून शहीद होण्याचा काहींचा प्रयत्न आहे. असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना लगावला.

पुढे ते म्हणाले की, पत्राचाळ ही गरीब मराठी माणसांसाठी होती, मराठी माणसाला लुटणारे कोण आहेत, हे आता कळाले. पुढे फडणवीस यांनी नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर भाष्य केले. आदित्य ठाकरे यांनी मनसेला भाजपची सी टीम म्हटले होते, त्यावर प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की, शिवसेना ही काँग्रेस, राष्ट्रवादीची कितवी टीम आहे. असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे.

पुढे फडणवीस यांनी राजू शेट्टी यांच्यावर भाष्य केले, ते म्हणाले की, महाविकास आघाडीसोबत गेल्याने राजू शेट्टींच्या विश्वार्हतेवर परिणाम झाला. त्यामुळे राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीला सोडण्याचा निर्णय घेतला, त्यांनी घेतलेला हा निर्णय योग्य आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला संपण्याच्या राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

संजय राऊतांचे सोमय्यांवर गंभीर आरोप

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले. आयएनएस विक्रांत युद्धनौकेवर स्मारक बनवण्याच्या नावाखाली सोमय्यांनी देशभरातील सामान्यांकडून 58 कोटी रुपये जमा केले. मात्र, ते पैसे मुलाच्या कंपनीत व निवडणुकीत लावले, असा आरोप राऊत यांनी केला आहे. त्यावर किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊतांकडे पुरावे असतील तर त्यांनी ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे द्यावेत. गुन्हा सिद्ध झाल्यास मी शिक्षा भोगायला तयार आहे, असे आव्हानच त्यांनी संजय राऊत यांना दिले.

आतापर्यंत सतरा आरोप केले, त्यांचे काय झाले?

शिवसेना खासदार संजय राऊत माझ्यावर दोन महिन्यांपासून सातत्याने आरोपच करत आहेत. त्यांनी माझ्यावर आतापर्यंत 17 आरोप केले. मात्र, त्या आरोपांचे काय झाले, असा सवाल किरीट सोमय्या यांनी विचारला आहे. मी कोट्यवधी रुपये अमित शहांना दिले. मी पीएमसी बँकेच्या माध्यमातून 426 कोटींचा घोटाळा केला. माझ्या मुलाच्या बांधकाम कंपनीनेही कोट्यवधींचा घोटाळा केला, असे अनेक आरोप राऊत यांनी माझ्यावर केले. याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दीड महिन्यापुर्वी एसआयटी स्थापन केली. मात्र, नंतर कोर्टात या आरोपांबाबत आपल्याकडे पुरावे नसल्याचे मुंबई पोलिस व ठाकरे सरकारनेच प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले. त्यामुळे संजय राऊत हे केवळ आरोप करतात. त्यांनी या प्रकरणात तरी पुरावे समोर आणावे, असे आव्हान किरीट सोमय्या यांनी दिले.

राऊतांचे आणखी घोटाळे समोर आणणार!

संजय राऊत यांनी माझ्यावर आरोप केले म्हणून त्यांच्यावरील ईडी कारवाया थांबणार नाही. त्यांच्याविरोधात येत्या काही दिवसांत आणखी प्रकरणे समोर येतील, असा इशाराही किरीट सोमय्या यांनी दिला. संजय राऊत आता भाजपविरोधात आक्रमक झाले आहे का, असा प्रश्न विचारताच राऊत यांचे आरोप म्हणजे खोदा पहाड, निकला चुहा, अशी स्थिती असते. त्यांच्याकडे आरोपांशिवाय दुसरे काहीही नसते. त्यामुळे त्यांना घाबरण्याचे काहीच कारण नसल्याचे सोमय्या म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...