आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देवेंद्र फडणवीस गौप्यस्फोट:शिवसेनेला सोडायचं नव्हतं, तर त्यांनी सेनेला मुख्यमंत्रीपद का दिले नाही? राष्ट्रवादीचा भाजपला सवाल 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देवेंद्र फडणवीस अजूनही भ्रमित अवस्थेमध्येच आहेत - विद्या चव्हाण

मुंबई | भाजपला थेट राष्ट्रवादीची ऑफर होती, यावर अनेक चर्चा झाल्या, मात्र शरद पवारांनी नंतर भूमिका बदलली असा दावा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. आता या दाव्याला राष्ट्रवातीच्या विद्या चव्हाण यांनी प्रतिप्रश्न केला आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. जर शिवसेनेला सोडायचं नव्हतं, तर त्यांना मुख्यमंत्रीपद का दिले नाही? असा सवाल त्यांनी केला आहे. 

विद्या चव्हाण बोलताना म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस अजूनही भ्रमित अवस्थेमध्येच आहेत. त्यांनी केलेले सर्व आरोप हे बिनबुडाचे आहेत. त्यांना जर शिवसेनेला सोडायचं नव्हतं, तर त्यांनी सेनेला मुख्यमंत्रीपद का दिले नाही? राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार उत्तमरित्या काम करत आहे. हे फडणवीसांनी स्वीकारायला हवं.

देवेंद्र फडणवीसांनी राजू परुळेकर यांना दिलेल्या मुलाखतीत केले हे गौप्यस्फोट 
- देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी आज गौप्यस्फोट करतोय की, दोन वर्षांपूर्वी एक स्थिती अशी होती. ज्यावेळी राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार हा निर्णय झाला होता. मात्र राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार असतील. तरीही शिवसेनेला सोबत घेऊनच चालावं लागेल असे पंतप्रधान मोदींनीकडून स्पष्ट सांगण्यात आले होते. जर काँग्रेसला बाजूला ठेवायचे असेल तर शिवसेनेला सोबत घेणे गरजेचं होतं. गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना निरोप दिला होता की, जर शिवसेना नसेल तर आम्ही तुम्हाला घेत नाही. 

- पुढे फडणवीस म्हणाले की, निवडणुका झाल्या त्यानंतर लक्षात आलं की, शिवसेना आता एकत्र येत नाही. यावेळी आमच्याकडे असणाऱ्या पर्यायांचा आम्ही विचार केला. यावेळी राष्ट्रवादी सोबत जाण्याची थेट ऑफर होती. थेट राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांची नाही. तर थेट राष्ट्रवादीची ऑफर होती. याविषयी योग्य चर्चा झाल्या. यामधील एका चर्चेमध्ये मी सहभागी होती. मात्र दुसऱ्या चर्चेत मी नव्हतो. एकदम टोकाच्या चर्चा झाल्या होत्या. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शऱद पवारांनी भूमिका बदलली आणि आम्ही कॉर्नर झालो. 

बातम्या आणखी आहेत...