आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी 1 फेब्रुवारी रोजी 2021 चा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या. या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला 3 लाख 5 हजार 611 कोटी रुपये दिल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अर्थसंकल्पाच्या समर्थनार्थ घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. अर्थसंकल्पाबाबत काही जणांनी गैरसमज पसरवले असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. पाच वर्षात जे पैसे मिळायला हवे होते, त्याच्या अनेक पट महाराष्ट्राला वर्षाला मिळाले. हा मोदी सरकार आणि दुसऱ्या सरकारमधील फरक आहे. असेही फडणवीस म्हणाले.
अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले?
> मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात 1832 कोटींची तरतूद
> पुणे मेट्रो प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात 3195 कोटींची तरतूद
> नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या दुसर्या टप्प्यासाठी अर्थसंकल्पात 5976 कोटींची तरतूद
> नाशिकमधील रेल्वे मार्गासाठी अर्थसंकल्पात 2092 कोटींची तरतूद
> राज्यातील रस्तेबांधणीसाठी एक लाख कोटींपेक्षा जास्त बजेट मिळालं आहे.
> 10 हजार किमी पेक्षा जास्त रस्ते बांधले जातील
> मुंबईला पिण्याचं पाणी मिळावं या प्रोजेक्टसाठी 3 हजार कोटी रूपये
> घरोघरी पाणी मिळाव यासाठी 1 हजार कोटी रूपये
> शेतकरी सन्मान निधी अंतर्गत 6 हजार 823 कोटी
> रेल्वे प्रकल्पांसाठी 86696 कोटींची तरतुद झालीय, त्यापैकी यावर्षी सात हजार कोटी महाराष्ट्राला मिळाले आहेत.
> बीड परळी रेल्वेमार्गालाही पैसे मिळाले आहेत
> मुंबईच्या लाईफलाईन लोकलसाठी साडे सहा कोटी रूपये दिले
भारतरत्नांनाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही
भारतरत्न मिळालेल्या व्यक्तींनाही अभिव्यक्ती स्वातंत्र मिळत नाही. या सेलिब्रिटिंनी देशाच्या हितासाठी ट्विट केले होते. त्यांच्या ट्विटच्या चौकशीची मागणी करणाऱ्यांचे मानसित संतुलन तपासले पाहिजे, अशी टीका फडणवीस यांनी केली.
हे सरकार विरोधी पक्षांशी संवाद करत नाही
महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षपद बिनविरोध होतं, निवडणूक होत नाही, पण हे सरकार विरोधी पक्षांशी संवाद करत नाही, विरोधी पक्षांच्या अधिकारांचे हनन करते, त्याबाबत आम्ही मित्रपक्षांसोबत बसू आणि निर्णय घेऊ. मात्र विधानसभा अध्यक्षपदावरुन सरकार घाबरलेले आहे, हे बघून मला आनंद होतोय, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.