आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्री ठाकरेंना आव्हान:म्हणाले -राज्यसभा छोटी लढाई होती, महापालिका निवडणुकाही जिंकून दाखवू

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभेची लढाई ही छोटी होती, महापालिका आणि पंचायत समिती निवडणुका मोठी लढाई असून त्या देखील भारतीय जनता पार्टी जिंकेल असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 2024 मध्ये राज्यात भाजप स्वबळावर जास्तीत जास्त जागा जिंकेल तसेच विधानसभा निवडणुकीत राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येईल, असे फडणवीस म्हणाले. राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तीन उमेदवार निवडणुक आल्यानंतर मुंबई त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले, त्यावेळी फडणवीसांनी भाष्य केले.

आपण जिंकल्यानंतर आता अनेक लोकांच्या तोंडाचे पाणी पळाले, काहींचे चेहरे पडले, काही बावचळलेत तर काही पिसाटले. पण जिंकलेल्या नंम्रता सोडायची नसते, जिंकण्याचा आनंद घेण्याचा असतो, असे म्हणत राज्याचे विधानसभेची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर आपली प्रतिक्रिया दिली.

पुढे फडणवीस म्हणाले की, जे लोक सांगत आहेत की, भाजपला विजय कोणामुळे मिळाला हे आम्हाला माहिती आहे. त्यांना जर खरच माहिती असेल तर ते काहीही करणार नाही, याचा कारण असे आहे की, त्यांना त्यांचे सरकार टिकवायचे महत्वाचे आहे त्यामुळे ते त्यांच्यावर कारवाई करणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.

आम्हाला ज्यांनी मदत केली त्यांच्यावर कारवाई करायला हे जर निघाले तर, ते निघून जातील आणि जे राज्य सरकारच्या प्रेशर खाली मदत करू शकले नाही पण मनाने आपल्यासोबत होते ते देखील महाविकास आघाडीतून निघून जातील, असा इशारा फडणवीसांनी दिला आहे.

मविआचे आमदार मदत करतील

विधान परिषदेची जागा आम्ही लढवत आहोत. विवेक बुद्धीला स्मरुन अनेक आमदारांनी राज्यसभा निवडणुकीत भाजपला जिंकवले. विधान परिषद निवडणुकीत सिक्रेट बॅलेट असल्याने जास्त जण (मविआ) आपल्याला मतदान करतील, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला आहे.

ठाकरेंना विचार करण्याची गरज

पुढे फडणवीस म्हणाले की, या संपूर्ण निवडणुकीनंतर या सरकारने आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंतरमुख विचार करण्याची गरज आहे. आम्ही जिंकलो हरलो याचा विषय नाही पण महाराष्ट्र थांबला आहे. राज्याचा विकास थांबला आहे, केवळ आमच्याशी लढायचे आहे म्हणून आमच्या काळात सुरू करण्यात आलेले सर्व प्रकल्प थांबवण्यात आले. त्यामुळे राज्याचे आतोनात नुकसान महाविकास आघाडी सरकारने केले.

बेईमानीने राज्य घेतले

शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. विमा कंपन्यांचा कोट्यवधी रुपयांचा फायदा झाला मात्र, मविआ सरकार एक शब्दही काढायला तयार नाही. आम्ही सत्तेत असताना आमच्याविरोधात वेगवेगळे आंदोलन, मोर्चे निघायचे. मात्र आज सर्व त्यांच्या घशात चालले आहे. राज्यातले प्रोजेक्ट बंद, मुंबईतले प्रोजेक्ट बंद, विजेचा तुटवडा, लोडशेडिंग अशा प्रकारे राज्य मागे चालला आहे. तुम्ही जरी बेईमानीने राज्य घेतले असले तरी, जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत तुम्ही राज्यकर्ते आहात, असे म्हणत फडणवीसांना महाविकास आघाडीवर टीका केली.

अवस्था अत्यंत खराब

राज्यकर्त्यांना राज्यकर्त्यांसारखे वागले पाहिजे, केवळ बदल्याची भूमिका घेऊन याचे त्याचे घर पाडले नाही पाहिजे. केवळ सरकार चालण्याकरती आणि समाजातल्या एकाही घटकाचा विचार करायचा नाही, ही जी अवस्था आज पाहायला मिळत आहे ती अत्यंत खराब आहे, अशी खंतही यावेळी फडणवीसांनी व्यक्त केली.

पाठिंत खंजीर खुपसला

2019 साली पंतप्रधान मोदींवर विश्वास ठेवून राज्यातल्या जनतेने भाजपला सर्वाधिक जागा दिल्या त्यात शिवसेना देखील आमच्यासोबत होती मात्र, त्या सत्तेचा अपमान झाला आणि ही सत्ता बाजूला सारुन आमच्या पाठींत खंजीर खुपसून जी सत्ता तुम्ही तयार केली ती किमान चालून तरी दाखवा, किमान दोन कामे तरी चांगली करुन दाखवा, असे आव्हान फडणवीसांनी मविआला दिले आहे.

राज्याचा कारोभार केंद्राच्या भरवशावर

पुढे फडणवीस म्हणाले की, राज्याचा सर्व कारोभार केंद्राच्या भरवशावर सुरू आहे. केंद्राने राज्याला जीएसटीचे पैसे देऊनही पुन्हा राज्य सरकारमधले नेतेमंडळी म्हणतात की, केंद्राकडून पैसै येणे बाकी आहे. आम्ही पेट्रोल-डिझेलचे दर कमी करणार नाही. देशातल्या सर्व राज्यांनी इंधनाचे दर कमी केल्यानंतरही एकमेव देशातील सर्वात श्रीमंत राज्य महाराष्ट्र येथील सरकार एक रुपयाने देखील पेट्रोल-डिझेलचा भाव कमी करायला तयार नाही.

मी पुन्हा येईन

राज्यसभेची लढाई छोटी होती, मोठी लढाई लढणे आणखी बाकी आहे. येत्या काळामध्ये महानगर पालिका जिल्हा परिषद, पंचायत समिती सगळीकडे महाविकास आघाडी सरकारला आपण धूर चारणार आहोत. मला विश्वास आहे की, 2024 मध्ये भाजप स्वत: जोरावर लोकसभेत बाजी मारेल आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजपचे सरकार येईल, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...