आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अर्णबच्या अटकेवर प्रतिक्रिया:'शिवसेना आणि काँग्रेसकडून आणीबाणीच्या मानसिकतेचे प्रदर्शन, सरकारविरोधी आवाज दडपण्याचा प्रयत्न लोकशाहीसाठी घातक' - देवेंद्र फडणवीस

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्रातील प्रेससाठी हा काळा दिवस असल्याचे आशिष शेलार म्हणाले आहेत.

रिपब्लिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामीला रायगड पोलिसांनी अटक केली आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. यावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. “आणीबाणी 1977 मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम! असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

देवेंद्र फडणवीस याविषयी बोलताना म्हणाले की, 'आणिबाणी 1977 मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम! आणिबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक. अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे.'

तर या कारावाईवर भाजप नेते आशिष शेलारांनीही राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. 'महाराष्ट्रातील प्रेससाठी हा काळा दिवस असल्याचे आशिष शेलार म्हणाले आहेत. यासोबतच महाविकास आघाडी सरकारचा असहिष्णुतेचा खरा चेहरा जगासमोर आल्याचेही ते म्हणाले. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलणारे आता शांत आहेत, प्रेस, सामान्य माणूस आणि नागरिक त्रस्त आहेत असे टीकास्त्र त्यांनी सरकारवर सोडले आहे.