आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरात निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया:म्हणाले- 'आप'चे 12 वाजले, केजरीवाल दिल्लीपुरते नेते; गुजरातेत आम्हाला 52% मताधिक्क्य

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातच्या जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी आणि भाजपवर विश्वास टाकला. आम्हाला तेथे 52 टक्के मते मिळाली. कधी नव्हे एवढा मानहाणीकारक पराभव काँग्रेसचा झाला. आम आदमी पक्षाची ताकद दिल्लीपुरतीच असून अरविंद केजरीवाल केवळ दिल्लीचेच नेते आहेत असा टोला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लगावला. गुजरातेत भाजपला निर्भेळ यश मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला.

मोदी, भाजपवर विश्वास

देवेंद्र फडणवीस म्हणाले, रेकार्ड सीट्स जनता देत असेल तर याचा अर्थ गुजरातेतील जनतेचा भाजपवर विश्वास आहे. गुजरातमधील परिवर्तन मोदी आणि भाजपने केले हे त्यांना समजले. मोदींच्या नेतृत्वात देश पुढे जाऊ शकतो हा विश्वास गुजरातमधील जनतेने दाखवला आहे.

आप, काॅंग्रेसला जनतेने नाकारले

फडणवीस म्हणाले, भाजपला बावन्न टक्के सीट्स मिळाले आहेत. 157 जागी भाजप पुढे आहे. काॅंग्रेस आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात कमी 16 जागावर आहेत. आपचा दावा फोल ठरला असून त्यांचे बारा वाजले आहेत. जनतेने आपला नाकारले आहे.

भाजपला मोठा प्रतिसाद

फडणवीस म्हणाले, आप पार्टी दिल्लीपुरती मर्यादीत आहे. गुजरातच्या जनतेचे मनापासून अभिनंदन करतो. मी सुद्धा गुजरातेत प्रचाराला गेलो होतो. गुजरातेतील जनतेचा मुड तेव्हाच लक्षात आले होते. मी जेथे सभांना गेलो तेथे उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

ठाकरेंकडे टोमणेअस्त्र

फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरेंजवळ ठोमणेअस्त्र आहे. टोमणे मारल्याशिवाय त्यांना काहीच जमत नाही. महाराष्ट्रातील उद्योग घालवणारे ठाकरेच आहेत. आता त्यांना उद्योगाचे महत्व त्यांना कळत आहे. त्यांनी रिफायनरीचा उद्योग महाराष्ट्राबाहेर घालवला. महाराष्ट्रात जे काही घडले त्याचा परिणाम त्यांच्या मनावर दिसत आहे. हिमाचल प्रदेशात अपेक्षित यश भाजपला मिळाले नाही. तिथे 42 टक्के भाजपला मते मिळाली.

राजकीय षडयंत्राचा वास

फडणवीस म्हणाले, मुंबई महापालिकेत भाजप आणि आमच्या मित्रपक्षाच्या महायुतीचा झेंडा लागणार आहे. दोन राज्यात अशांततता पसरवण्याचा प्रयत्न होत आहे. यासाठी काही लोक कार्यरत झाले आहेत. मी तेथील मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना बोललो आहे. दोन्ही राज्य शांतता अबाधित राखण्यावर ठाम आहेत. यामागे राजकीय षडयंत्र आहे असा वास आता येत आहे.

बातम्या आणखी आहेत...