आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळी अधिवेशन:भाजपने सभागृहाबाहेर भरवली प्रतिविधानसभा; विमा कंपन्यांनी सरकारला लॉलीपॉप दिले - देवेंद्र फडणवीस

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बियाणं खपाव म्हणून महाबिजला उत्पादन करु दिले नाही

राज्यात कालपासून पावसाळी अधिवेशन सुरु असून आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपच्या 12 आमदारांवर केलेल्या निलंबनाच्या कारवाई भाजप आक्रमक भूमिकेत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने राज्यातील 1 हजार ठिकाणी आंदालने सुरु करण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, भाजपने आज दुसऱ्या दिवशी आक्रमक भूमिका घेत विधीमंडळाबाहेर प्रतिविधानसभा भरवली आहे. यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

हे सरकार शेतकऱ्यांना लुबाडण्याचा काम करत असून राज्यातील शेतकऱ्यांना विमा मिळूच नये यासाठी काम करत असल्याचा गंभीर आरोप फडणवीसांनी केला आहे. विमा कंपन्यांचे आघाडी सरकारशी साटेलोट असून या कंपन्यांनी सरकारला लॉलीपॉप दिल्याचे ते म्हणाले. आमच्या सरकारने शेतकऱ्यांना पिकविम्याचा 112 टक्के लाभ मिळवून दिला होता तर यासरकारने केवळ 18 टक्के लाभ दिल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, त्यांनी धान्य घोटळ्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही यावेळी केली आहे.

बियाणं खपाव म्हणून महाबिजला उत्पादन करु दिले नाही
फडणवीस पुढे म्हणाले की, आघाडी सरकारने खाजगी कंपन्यांना फायदा पोहचण्यासाठी महाबिजला मोठ्या प्रमाणावर उत्पादन करु दिले नाही. याचा फायदा खाजगी बियाने कंपन्यांना मोठ्या प्रमाणात झाला असून याकाळात शेतकऱ्यांची मोठी लूट झाल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...