आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौघांची नावे वगळली:मुंबै बँक घोटाळ्यातून देवेेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय प्रवीण दरेकरांना क्लीन चिट

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने (ईओडब्ल्यू) मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. (मुंबै बँक) आर्थिक अनियमितता प्रकरणी १५ हजार पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले. ईओडब्ल्यू ने आरोपपत्रातून प्रवीण दरेकर, शिवाजी नलावडे, राजा नलावडे आणि प्रकाश शिरवाडकर यांची नावे वगळली आहेत. दरेकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांना देण्यात आलेल्या क्लीन चिटवरून राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे.

या बहुचर्चित राज्यातील कथित बँक घोटाळ्यात १२३ कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. भाजप कार्यकर्ता विवेकानंद गुप्ता यांनी एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात मुंबई बँकेत घोटाळ्याचा आरोप करत एफआयआर दाखल केला होता. २०१५ मध्ये प्रवीण दरेकर आणि इतरांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आणि तपास ईओडब्ल्यू कडे सोपवण्यात आला. मुंबई पोलिसांनी २०१९ मध्ये एस्प्लेनेड कोर्टात ‘सी समरी’ रिपोर्ट दाखल करण्यात आला आहे.

तिघांविरोधात २९९ कलमानुसार आरोपपत्र दाखल न्यायालयाने २०२१ मध्ये तपास अधिकाऱ्याला अधिक चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी आता १५ हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. यात फडणवीस यांचे जवळचे दरेकर यांचे नाव वगळण्यात आले आहे. दरेकर यांचे नाव वगळण्याबरोबरच मुंबई पोलिसांनी सोमवारी याप्रकरणी तीन जणांविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. धक्कादायक बाब म्हणजे या तिघांविरुद्ध पोलिसांनी सीआरपीसी कलम २९९ अंतर्गत आरोपपत्र दाखल केले आहे. त्यांच्याबाबत आरोपपत्रात म्हटले आहे की, हे आरोपी शोधण्यायोग्य नाहीत.

दरेकर यांचा मंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला क्लीन चिट मिळाल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय दरेकर यांना मंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण फडणवीसांनीच दरेकर यांना दोन वेळा विधान परिषदेचे सदस्य केले आणि एकदा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते केले होते.

बातम्या आणखी आहेत...