आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिक्षण क्षेत्रासाठी 1 लाख कोटीहून अधिकची तरतूद करण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याची मोठी घोषणा यावेळी करण्यात आली. अंगणवाडी ते उच्चशिक्षण 1 लाख 866 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प हा अमृतकाळातील पहिलाच अर्थसंकल्प असून तो ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सत्तांतरानंतर आज शिंदे-फडणवीस सरकार प्रथमच आपला अर्थसंकल्प सादर करत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे अर्थविभागाचा कारभार आहे. त्यामुळे अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाही हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी पंच अमृतापैकी चौथ्या अमृत पंचमात शिक्षण क्षेत्राविषयी संबंधित विविध घोषणा जाहीर केल्या. यामध्ये शिक्षणसेवकांना भरघोस मानधन जाहीर करण्यात आले आहे. यात सरासरी 10 हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूजमध्ये क्रिडा विद्यापीठाची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात 14 वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणार असल्याची घोषणाही करण्यात आली.
विद्यार्थ्यांना मोफत गणवेश
राज्यात 14 ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे करण्यात येणार आहे. सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, धाराशिव, परभणी, अमरावती, भंडारा, जळगाव, रत्नागिरी, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर, अंबरनाथ (ठाणे) यांचा समावेश. विद्यार्थ्यांना आता भरीव शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देणार असल्याची घोषणा करण्यात आली.
शिक्षकांच्या मानधनात अशी वाढ
विद्यार्थ्यांना भरीव शिष्यवृत्ती
शैक्षणिक संस्थांना 500 कोटी
वरील सर्व संस्थांना 500 कोटी रूपये विशेष अनुदान देण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.